• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 17, 2026
in मनोरंजन
0
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
0
SHARES
149
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

अकलूज | प्रतिनिधीअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाट्य चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यभरातील शाखांशी थेट संवाद साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी मध्यवर्ती शाखेच्या वतीने राज्यव्यापी शाखा निरीक्षण व संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या दौऱ्याअंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर आणि कोषाध्यक्ष सतीश लटके यांनी अकलूज शाखेला भेट देऊन शाखेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

अकलूज शाखेच्या वतीने सन २०१४ ते २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध नाट्यविषयक उपक्रमांची, सांस्कृतिक कार्यक्रमांची तसेच स्थानिक कलाकार व रंगकर्मींना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाची माहिती मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.

गेल्या बारा वर्षांच्या कालखंडात अकलूज शाखेने नाट्य क्षेत्राशी असलेली आपली नाळ कायम ठेवत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नाट्य चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. या कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांनी अकलूज शाखेच्या कार्याची विशेष दखल घेतली.

यावेळी बोलताना उपाध्यक्ष नरेश गडेकर म्हणाले, “महाराष्ट्रातील नाट्य शाखांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद दौरा आहे. मध्यवर्ती शाखा आणि इतर शाखांचे नाते हे वडील आणि मुलाचे आहे. शाखांना त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि नाट्य शाखांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक ती मदत करणे, ही मध्यवर्ती शाखेची जबाबदारी आहे.

शाखांचा विस्तार करण्यासाठी पाहिजे ती मदत मध्यवर्ती शाखेकडून केली जाईल.

ग्रामीण भागातील नाट्य चळवळीला बळ देण्यासाठी स्थानिक शाखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही गडेकर यांनी सांगितले. शहरांपुरती नाट्य चळवळ मर्यादित न राहता तालुका व ग्रामीण भागातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नाट्यप्रेमींना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे.

त्यासाठी स्थानिक शाखांनी सातत्याने उपक्रम राबवावेत आणि मध्यवर्ती शाखेने त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

कोषाध्यक्ष सतीश लटके यांनीही अकलूज शाखेच्या कार्याची माहिती घेत शाखेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले

. शाखेने आतापर्यंत केलेल्या कामाबरोबरच आगामी काळात नाट्य क्षेत्रातील नव्या पिढीला जोडण्यासाठी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

. स्थानिक कलाकारांना संधी देणे, नाट्य प्रशिक्षण, कार्यशाळा, स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून शाखेचे कार्य अधिक व्यापक करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

या भेटीदरम्यान अकलूज शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अकलूज शाखा अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कार्यकारणी सदस्या सौ.शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती, आगामी उपक्रमांचे नियोजन तसेच नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबी मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांनी शाखेच्या अडचणी जाणून घेत भविष्यात आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे अकलूज शाखेतील पदाधिकारी, कलाकार व नाट्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अकलूज परिसरातील नाट्य चळवळीला आणखी व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी सिनेअभिनेते व उपाध्यक्ष अजय तपकीरे, मुख्य कार्यवाह डॉ.विश्वनाथ आवड, सहकार्यवाह सुनील कांबळे, औदुंबर भिसे, कोषाध्यक्ष अमोल खरात, कार्यकारणी सदस्य शिवदत्त नारायणकर, नितीन बनकर, अनिल जाधव, अमित पुंज, श्रीकांत राऊत, लाला मुजावर, मनोज वर्धम, वैभव आंबेकर यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश
मनोरंजन

अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश

February 2, 2026
Next Post
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In