गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
माळशिरस : (रणजितदादा गायकवाड )आरोग्य हीच खरी संपत्ती आणि गरजू रुग्णांची सेवा हीच खरी मानवसेवा, या भावनेतून माळशिरस तालुक्याचे सुपुत्र तथा आरोग्यदूत राहुल (दादा) वाघमोडे पाटील यांनी एका गरजू रुग्णाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील श्री. बापू भगवान साठे हे लिव्हरच्या आजाराने त्रस्त असून, पुणे येथील के. एम. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारांचा वाढता खर्च पेलणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते
.ही बाब लक्षात येताच राहुलदादा वाघमोडे पाटील यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे संकटात सापडलेल्या रुग्णाच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी मदतीचा हात देणे, त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे, हाच या सेवाकार्यामागील उद्देश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली
.श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने बापू साठे यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभो आणि ते आजारातून पूर्णपणे बरे होवोत, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.’जिथे संकट, तिथे राहुलदादा! जनसेवा हेच माझे कर्तव्य!’ या भावनेतून त्यांनी केलेल्या या मदतकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.







