मनःशांतीचा मंत्र! अकलूजमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आनंद योग शिबिरासाठी आजही नोंदणीची संधी! ताणतणावमुक्त जीवनासाठी योग, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रियेचे मार्गदर्शन
अकलूज : आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताणतणाव, भीती, अस्वस्थता आणि मानसिक तणाव यांपासून मुक्त होऊन आनंदी व सकारात्मक जीवन जगण्यासाठी अकलूजमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने आयोजित ‘आनंद योग शिबिरा’साठी आजही नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगळुरू शाखा अकलूज यांच्या वतीने २६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८:३० या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये योग, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रिया यांचे मार्गदर्शन योगशिक्षक प्रा. धनंजय देशमुख (एम.ए. योगशास्त्र) करणार आहेत.
‘आजचं युद्ध बाहेर नाही, तर मनात चालू आहे!’ या विचारातून मनावरील ताण कमी करणे, विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात मानसिक शांततेचा अनुभव घेणे, हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. गुरुदेवांच्या विचारांनुसार, ध्यान आणि सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
शिबिराचे स्थळ वन अकलूज हॉल, कांतीलाल भवनच्या पाठीमागे, अकलूज. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क निलेश नाना देशमुख – ७०३८०९६९९९.रामचंद्र तरेंगे सर – ८२०८९७१९४४.अतुल भैय्या माने – ८३७९००९२६८.प्रमोद लंबटकर – ९८९०५५०५६५
अकलूज व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
.“शांत मन, सुदृढ शरीर, सुंदर समाज!”स्वतःसाठी थोडा वेळ द्या… मनःशांतीच्या दिशेने एक पाऊल टाका आणि आनंदी जीवनाचा अनुभव घ्या!






