कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

चाकोरे : कैलासवासी कमलताई कोंडीराम पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी चाकोरे, ता. माळशिरस येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
.या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह. भ. प. श्रीहरी महाराज नामदास यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तन सोहळ्यानंतर आरती, पुष्पवृष्टी तसेच उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविक, नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






