अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश
अकलूज, (प्रतिनिधी) –
अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या गायन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये कु. कशवी अशोक पोखरे हिने विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला.
तसेच ह. भ. प. सौ. पूनम अभिमन्यू साळुंखे,ह. भ. प. सौ. निकिता अभिजित बाबर,ह. भ. प. कु. तृप्ती दादासो जाधव,कु. पूजा लक्ष्मण लोखंडे आणि कु. संस्कृती अभिमन्यू साळुंखे यांनीही विशेष यश मिळविले आहे.
या यशासाठी श्रीपाद संगीत क्लासेसच्या संचालिका कु. मंजिरी लक्ष्मणराव लोखंडे यांनी विद्यार्थिनींसाठी सातत्याने मार्गदर्शन व विशेष परिश्रम घेतले.
यासंदर्भात बोलताना मंजिरी लोखंडे म्हणाल्या की,“शास्त्रीय संगीताचा दर्जा टिकवून ठेवणे, संगीताची सखोल माहिती मिळवणे आणि त्याचे आपल्या मनावर व व्यक्तिमत्त्वावर होणारे सकारात्मक परिणाम अनुभवणे अत्यंत आवश्यक आहे.”
अकलूज व परिसरातील मुला-मुलींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी हे संगीत क्लासेस सुरू करण्यात आले असून, येत्या उन्हाळी सुट्टीत विशेष संगीत वर्ग घेतले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी ८६२३९६७३८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







