• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 23, 2026
in देश-विदेश
0
दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

दिल्ली (प्रतिनिधी )आषाढी वारी, कार्तिकी वारी तसेच वर्षभर पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सेवा सुरू करून तिला “चंद्रभागा एक्सप्रेस” असे नाव द्यावे, तसेच पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.

या मागणीला अधिक बळ देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय ४२ खासदारांच्या सह्या घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर केले.

तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वाहतूक, व्यापार, शेती आणि दळणवळणाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली व महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा केला.यात प्रामुख्याने पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण व भूमी अधिग्रहणाबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीची बैठक आयोजित करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली.

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ‘गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल’ (GCT) उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आणि सध्या बंद असलेली दिल्ली-कोलकत्ता-मुजफ्फरनगर-शालिमार ‘किसान रेल्वे’ सेवा पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली.तसेच लातूर-कुर्डूवाडी-सोलापूर आणि मिरज-कुर्डूवाडी–दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याची मागणी करण्यात आली.

मिरज-कुर्डूवाडी-लातूर रोड या सुमारे ३७५ कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करून प्रकल्पाला वेग देण्याचीही मागणी करण्यात आली.

सोलापूर रेल्वे विभागातील वाढती लोकसंख्या आणि पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा विचार करून सांगोला तालुक्यातील जवळा व बामणी, पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव तसेच माढा तालुक्यातील म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके मंजूर करण्याची मागणीही खासदार मोहिते-पाटील यांनी केली.

याशिवाय कुर्डूवाडी-पंढरपूर मार्गावरील वापरात नसलेल्या जुन्या मीटरगेज रेल्वे मार्गालगतची रिक्त जमीन विकासासाठी वापरून तेथे व्यापारी संकुले उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडण्यात आला.

या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना दिले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे
देश-विदेश

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे

July 16, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’

July 15, 2026
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
सस्टनेबल फॅशनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःची ओळख करणारी  अकलूज च्या “निशा’ची ‘निशाणी’ पोहचली साता समुद्रापार..
देश-विदेश

सस्टनेबल फॅशनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःची ओळख करणारी अकलूज च्या “निशा’ची ‘निशाणी’ पोहचली साता समुद्रापार..

May 4, 2025
Next Post
निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडून माळशिरस तालुक्यातील तलाव पाझर तलाव भरून घ्या*                                 माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांची मागणी

निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडून माळशिरस तालुक्यातील तलाव पाझर तलाव भरून घ्या* माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In