उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
दिल्ली – उद्योजक व लेखक श्री. शरद तांदळे यांनी नुकतीच दिल्ली येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी तांदळे यांचा विशेष सन्मान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.भेटीदरम्यान, विविध विषयांवर संवाद साधला.
यात राजकीय घडामोडी, सामाजिक उपक्रम, उद्योगक्षेत्रातील विकास, तसेच देशातील आणि स्थानिक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. विशेषत: उद्योगक्षेत्रातील संधी, नवउद्योजकांसाठीच्या योजना आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयांवर सखोल चर्चा झाली.
शरद तांदळे यांनी या भेटीत आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले आणि भविष्यातील सहकार्याच्या संधींबाबत संवाद साधला.
त्यानंतर खासदार मोहिते पाटील यांनीही उद्योग, समाज आणि राजकारण या विविध क्षेत्रांमध्ये एकत्रित काम करण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
भेटीत पुढील काळात उद्योग-समाज-संस्कृती यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.







