आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
प्रतिनिधी |विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. (I-Champ Abacus Pvt. Ltd.) यांच्या वतीने ‘मलेशिया इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन’ आयोजित करण्यात येणार आहे.
ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशिया येथे होणार असून, विविध देशांतील अबॅकस विद्यार्थ्यांना एकाच मंचावर स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे
.संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील प्रतिभावान स्पर्धकांसोबत आपले गणितीय कौशल्य, वेग आणि बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच आत्मविश्वास वाढविण्यासाठीही ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे
.स्पर्धेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जागतिक स्तरावरील स्पर्धेचा अनुभव, विविध देशांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आणि नव्या संस्कृतीचा परिचय. विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव आणि भविष्यातील यशाचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो,
असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पासपोर्टची तयारी आतापासूनच सुरू करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे
.स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती तसेच नोंदणीसाठी इच्छुकांनी ९८५०७५४००४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.







