पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशनचे प्रमुख उमेश महाजन यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूज येथील आय चॅम्प अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय व घवघवीत यश संपादन केले.
संस्थेचे संचालक विशाल माने व स्नेहल माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत आय चॅम्प चे तब्बल 25विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 19विदयार्थ्यांनी यश संपादन केले.
या स्पर्धेत आय चॅम्प अबॅकसचे *चॅम्पियन ऑफ चॅम्पियन* यशराज अजिनाथ कदम, रुद्रप्रताप सोमनाथ घाडगे, स्वरा विनोदकुमार म्हसवडे, प्रणव नागनाथ चव्हाण, चैतन्य भारत राठोड, l *चॅम्पियन* आर्या भागवत काटकर, सिद्धेश उत्तम डांगे, रिद्धी रामेश्वर गायकवाड, सांची उत्तम डांगे, वैभवी प्रशांत हजारे, शिवराज संतोष चव्हाण, वेदांत दीपक बावचे, अनय महादेव दगडे, वेदांत विजय करवर, चैतन्य रुपेश राठोड *फस्ट रँक* शरण्या अमोल शेगावकर, आनिफा अमीर मुल्ला, सिद्धी दादासाहेब दगडे, आदिती महादेव दगडे, *सेकंड रँक* प्रिया बाबासाहेब गेजगे, किरण तात्या दगडे, यशवर्धन नागनाथ दराडे, संकष्टी तुषार अडगळे, अर्णव महेश करपे *थर्ड रँक* प्रतीक काशिलिंग तुरेवाले यांनी घवघवीत यश संपादन केले

.या सर्व विदयार्थ्यांना सौ. अनिता अंपळकर, सौ. स्वाती पवार, सौ. राजश्री देशमुख, कु. स्वाती कदम, कु. शुभांगी बिस्नाळ या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.
या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, दीव-दमण, तेलंगणा आणि दिल्ली या विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच २८ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले होते
.दरम्यान, आय चॅम्प अबॅकससाठी आणखी एक अभिमानास्पद बाब म्हणजे संस्थेच्या संचालिका स्नेहल माने यांना त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन व मार्गदर्शनाबद्दल ‘बेस्ट अबॅकस टीचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संचालक विशाल माने व स्नेहल माने यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.







