*श्रीनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
भंडीशेगाव : (संतोष कांबळे )आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, भंडीशेगाव संचलित श्रीनाथ विद्यालय व बी. डी. माने प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल, भंडीशेगाव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला

. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. विश्वजीत बाजीराव माने सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विलास ज्ञानोबा यलमार उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती विजयामाला बाजीराव माने, सचिव श्री. मारुती तुकाराम गायकवाड, शिक्षणप्रेमी श्री. बाबासाहेब यलमार गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषाताई चव्हाण, मनिषाताई यलमार, संतोष ननवरे, मंगेश ननवरे, मारुती गिड्डे, नवनाथ माने, गणेश माने, मधुकर यलमार, पांडुरंग सुरवसे, रमेश शेगावकर, लक्ष्मण रणखांबे, मल्लिकार्जुन यलमार, दीपक डिंगरे, ज्ञानेश्वर गिड्डे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश*स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून NHA 965 चे श्री. राजेश सोनी साहेब, श्री. विशाल काकडे व श्री. मयूर काळे यांच्या वतीने प्रशालेसाठी विविध वृक्ष भेट देण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. देशसेवेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.*विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ*कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, प्रभावी भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कवायत तसेच विविध उपक्रम सादर करून स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांच्या सुंदर सादरीकरणाला उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
बी. डी. माने प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता अंपळकर, श्रीनाथ विद्यालय व बी. डी. माने इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक विश्वजीत बाजीराव माने यांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपावे आणि देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार, सुजाण व कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी प्रशालेची माजी विद्यार्थिनी सृष्टी बिभीषण अंपळकर हिच्या कडून रु. 10000 इतकी ठेव प्रशालेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपासाठी दिले. तसेच अनिता अंपळकर यांचेकडून स्मार्टवॉच व राजश्री कंडरे यांचेकडून रु. 1000 इतकी रक्कम जिल्हा स्तरीय बुद्धिवंत ATS परीक्षा यासाठी बक्षीस दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चिवडा, लाडू व बिस्किटांचे खाऊ वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडली.“जनसेवा हीच ईशसेवा” या संस्थेच्या ब्रीदवाक्याला साजेशा सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांसह स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.







