शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

अकलूज (प्रतिनिधी )शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या खाशाबा जाधव क्रिडा संकुल येथे ‘सृजनरंग महोत्सव २०२६-२७“अत्यंत उत्साही आणि सांस्कृतिक वातावरणात हि स्पर्धा” शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झाली

.स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर व महोत्सवाचे समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड व डॅा सुधा बनसोडे, डॅा दमयंती कांबळे, डॅा सविता सातपुते प्रा पद्मा रहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते पार पडले.


याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर यांनी, “विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, क्रीडाकौशल्य वाढीस लागावे आणि वैचारिक क्षमता समृद्ध व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,” असे स्पष्ट करत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.


या स्पर्धेत आकर्षक कलाकृतींचे सादरीकरण महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या कल्पकतेचा व कलागुणांचा उत्कृष्ट अविष्कार घडवला. विविध पारंपरिक व आधुनिक संकल्पनांवर आधारित रेखाटलेल्या आकर्षक मेहंदीच्या डिझाईन्सने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

या स्पर्धेचे परीक्षण प्रा. लोखंडे मॅडम आणि प्रा. सोनार मॅडम यांनी केले.


त्यांनी रेखीवपणा, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड केली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा सुधा बनसोडे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा पद्मा रहाटे यांनी केले तर आभार डॅा सविता सातपुते यांनी मानले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सिनीयर व ज्युनियर सर्व विभागातील महिला विभाग प्रमुख सहकारी महिला प्राध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले.

या स्पर्धेत एकुण ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील महिला विंगमधील सर्वांचे विशेष धन्यवाद








