बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई! आगळगावात ₹१७,७३४ चा प्रतिबंधित गुटखा जप्त; धसपिंपळगावात अवैध दारूविक्रीवरही कारवाई
| विशेष प्रतिनिधी भैय्या खिलारे
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक आणि अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली.
आगळगाव येथून ₹१७ हजार ७३४ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तर धसपिंपळगाव येथे अवैधरीत्या दारू बाळगल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून ₹२ हजार ५९० किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
आगळगावात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त
रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरमध्ये पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून केआर १०००, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको असा एकूण ₹१७ हजार ७३४ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
धसपिंपळगावात अवैध दारूविक्रीविरोधात दोन कारवाया
धसपिंपळगाव येथे ११ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अवैध दारूसाठ्याविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या.पहिल्या कारवाईत सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवारातील जिवलग हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला चंद्रकांत बलभीम पिंगळे (वय ५८, सध्या रा. धसपिंपळगाव, ता. बार्शी) याच्याकडे विनापरवाना देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या ११ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत ₹८८० असून, याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील नदीशेजारी मुन्ना भालेकर यांच्या पत्राशेडमागे संतोष अर्जुन धस (वय ५१, रा. धसपिंपळगाव, ता. बार्शी) याच्याकडे देशी दारूच्या १२ बाटल्या आणि रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या तीन बाटल्या आढळून आल्या.
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ₹१ हजार ७१० असून, याप्रकरणीही महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, अमृत खेडकर, गणेश दळवी, अमृता गुंड, प्रदीप चौधरी, महेश माने, ओमप्रकाश दासरे, रोहित बागल आणि अश्विनी साबळे यांनी सहभाग घेतला
.संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत.
प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारूविक्रीविरोधात बार्शी तालुका पोलिसांकडून कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.






