*निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडून माळशिरस तालुक्यातील तलाव पाझर तलाव भरून घ्या* माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांची मागणी
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

विर धरणातून निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडून लाभक्षेत्रातील तलाव पाझर तलाव भरून घेऊन माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा द्यावा
यावर्षी माळशिरस तालुक्यात अद्यापपर्यंत पुरसा पाऊस पडलाच नाही त्यामुळे आनेक भागात पेरण्याझाल्याच नाहीत जिथ झाल्यात तिथे पावसाअभावी उगवल्याच नाहीत तालुक्यातील शेतकरी आधीच अडचणीत आहे

एवढ्या कडक उन्हाळ्यात कसबस जगवलेल्या फळबागा उस भरपावसाळ्यात पाण्याअभावी जागेवर होरपळत आहेत त्यांना दिलासा देण्याऐवजी नदीपात्रात सोडलेल पाणी वाहुनच जातय तरीही जलसंपदा विभागाचे अधिकारी अभियंते याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करताहेत ते शेतकर्यांनी पिकवलेल अन्नच खातातका दुसरं काही खातात आसा प्रश्न निर्माण होतो आहे

माळशिरस तालुक्यात आनेक गावात शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अनेक माळशिरस तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजने पाण्याअभावी बंद आहेत
जर निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडून माळशिरस तालुक्यातील तलाव भरून घेऊन गाव ओढ्यांना पाणी सोडलं तर पाऊस पडेपर्यंत शेतीचाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल याच भाण ठेवून तालुक्यातील राजकारणी लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे पण दुर्दैवाने ते पण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत
(माळशिरस तालुक्यातील आनेक ग्रामपंचायतींनी याबाबत मागणी केलेली आहे तरीही संबंधित विभाग याची दखल घेत नाहीत)







