सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
अकलूज (प्रतिनिधी) : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, अकलूज यांच्या सन २०२६-२०२७ च्या गळीत हंगामाचा नुकताच शुभारंभ झाला.
या पार्श्वभूमीवर कोळेगाव येथून कारखान्याकडे ऊस भरून घेऊन जाणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे पूजन अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक श्री. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याशी संलग्न शिवसृष्टी मल्टिमीडिया लेझर शोचे संचालक धनंजय (भाऊ) दुपडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत, रत्नप्रभादेवी बीज उत्पादक संघ, अकलूजचे माजी संचालक सचिन सावंत यांच्यासह ज्ञानेश्वर सावंत, नागनाथ ज्ञानेश्वर दुपडे, गणेश निंबाळकर, विजय दुपडे, धनंजय दुपडे, प्रसाद दुपडे, केशव सावंत, अनिल सावंत, सुभाष सावंत आदी उपस्थित होते.तसेच विविध सहकारी संस्था आणि संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतुकीचा प्रारंभ झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.







