मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
.मळोली /प्रतिनिधी,महेश घाडगे,
मळोली.ता. माळशिरस येथील डॉ. गायत्री विलास क्षीरसागर यांनी मेडिकल क्षेत्रातील बी.एच.एम.एस ही पदवी प्राप्त केल्याबद्दल माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य श्री रणजितसिंह (बापू)जाधव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. गायत्री विलास क्षीरसागर यांनी माध्यमिक शिक्षण मळोली येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी घेतले तर वैद्यकीय शिक्षण सातारा येथील मेडिकल कॉलेज मध्ये पूर्ण केले.
डॉ गायत्री हिचे वडील एस टी. महामंडळात अकलूज विभागात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत.

यासत्कार प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य श्री रणजितसिंह (बापू)जाधव माजी सरपंच श्री गणेश पाटील,अजितरावं इंगोले, निलेश जाधव सर, तानाजी जाधव, प्रभाकर घोरपडे,सचिन जाधव, गणेश शिंदे, अनिरुद्ध क्षीरसागर,विजय क्षीरसागर, अपेक्षित जाधव, गणेश इंगोले, बाबुराव जाधव व क्षीरसागर कुटुंबीय उपस्थित होते.
या वेळी अकलूज विभागात वाहतूक नियंत्रक पदी निवड झाल्याबद्दल विलास क्षीरसागर यांना सन्मान करण्यात आला.







