• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

आनंदडोह तुकोबांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक.योगेश सोमन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 20, 2023
in मनोरंजन
0
आनंदडोह तुकोबांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक.योगेश सोमन
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आनंदडोह तुकोबांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक.योगेश सोमन

संग्रामनगर दि.१९ (केदार लोहकरे यांजकडून)
“आनंदडोह” हा संपूर्ण दीर्घांक म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक आहे.यात आपल्या विठ्ठल भक्तीची चिकित्सा तर तुकाराम महाराज करतातच,पण आपल्याला अभिप्रेत विठ्ठल म्हणजे काय हेही ते सांगतात.भक्तीच्या नावाखाली पाळल्या जाणार्‍या परंपरा आणि त्या परंपरा घालून देणारे त्यांचे पाईक यांचा येथेच्छ शब्दांत समाचारही ते घेतात.भक्तीची व्याख्या नीट समजावून सांगताना विठ्ठलाचे निराकार,निरावयव रूप आपल्या प्रत्येकात,निसर्गात आहे,याची जाणीवही ते करून देतात.असे मत सिनेअभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत तुकोबांचे आत्मविश्लेषण केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा अकलूज,शंकरराव मोहिते महाविद्यालय,ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉंप्युटर ॲण्ड टेक्नॉलॉजी, शिवरत्न इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद,पुणे व सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने योगेश सोमण अभिनीत संत तुकाराम महाराज यांच्या जिवनावर आधारित ‘आनंदडोह’ एकपात्री दिर्घांकाचे आयोजन अकलूज येथे केले होते. त्याप्रसंगी त्यांनी तुकोबांचे आत्मचरित्र कथन केले.
संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडालेली आहे आणि या तेरा दिवसाच्या काळातले,तुकोबांचे हे आत्मविश्लेषण आहे. सिंहावलोकनाच्या मार्गाने जाणारे हे आत्मविश्लेषण दस्तुरखुद्द तुकोबा तर करतातच,पण त्यांचेच स्त्रीरूप असणारी त्यांची पत्नी आवडीही करते.खरे तर संत तुकाराम महाराज आपल्याला कधी समजलेच नाहीत आणि झेपलेही नाहीत हे म्हणणं जास्त योग्य ठरेल.नेमका हाच तुकाराम लोकांसमोर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न रंगकर्मी योगेश सोमण यांनी आपल्या ‘आनंदडोह’ या दीर्घांकाद्वारे केला आहे.तुकारामांच्या भोवतीचे ‘साजिरे-गोजिरे’ भक्तीमय रूप लोकांना ठावूक असले तरी हा बंडखोरी करणारा तुकोबा स्वतःच्या वैचारिक घुसळणीत प्रेक्षकांनाही सामील करून घेतो. ‘आनंदडोह’ हे काही तुकोबांचे चरित्र नाही,किंवा त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर आधारीत सुसंगत कथानकही नाही.याला कथा आहे पण तुकोबांना स्वतःची वैचारिक परंपरा मांडण्यास सहाय्यभूत ठरेल.
तुकाराम हे व्यक्तिमत्व पावणेदोन तासांच्या दीर्घांकात मावणारे नाही,पण सोमण यांनी त्याच्या नेमक्या त्यांच्या भूमिके वरच भर देऊन आणि ती तशीच मांडून संहितेत बंदिस्त केली आहे.शिवाय ती तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने सादरही केली आहे.ही संहिता म्हणजे तुकारामांच्या अभंगांच्या दरम्यान भरून काढलेले ‘गद्य’ नाही, तर तिलाही एक स्वतंत्र अस्तित्व आहे.म्हणूनच अभंगाच्याच जोडीने त्याच्या संवादालाही टाळ्या पडतात ते त्यातल्या सकसपणामुळेच.तुकोबांची मनोभूमिका अधिक स्पष्ट करणारे हे संवाद आहेत. सोमण यांनी तुकाराम आणि आवडी अशी दोघांची पात्र रचना करून दोन्ही पात्रे आपणच मांडली आहेत. पण त्यांच्या मते आवडी ही तुकारामांचेच स्त्रीरूप आहे. तुकारामांविषयीच्या अनेक गोष्टी ती आपल्या भाबड्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवते.त्यामुळे अनेकदा क्लिष्ट नि वैचारिक होऊ पाहणारे नाटक ती सावरून धरते. तुकारामांच्या अध्यात्मिक भूमिकेचे पदर उलगडत असताना आवडीचे संवाद अर्थातच, जास्त ‘मानवी’ वाटतात.नि ते लोकांना भिडतातही.तुकोबा पाहणार्‍यांची ही वैचारिक घुसळण करणारा हा ‘आनंदडोह’ आहे.यात डुंबल्या शिवाय राहू नका असेही सोमन म्हणाले.
यावेळी विविध संस्थांचे संचालक,पदाधिकारी व नाट्य रसिक उपस्थित होते.

चौकट
नाट्यासाठी खास सेट
‘आनंदडोह’ या एकपात्री दिर्घांकासाठी अकलूज येथील सुनिल कांबळे यांनी स्वखर्चाने मनमोहक नेपथ्य उभा केले. या नेपथ्याचे कौतुक योगेश सोमनसह रसिकांनीही केले
.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य शासनाच्या “शासन आपल्या दारी” योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ३२८ नागरीकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ

महाराष्ट्र राज्य शासनाच्या "शासन आपल्या दारी" योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ३२८ नागरीकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In