• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

अकलूज येथील प्रा. धीरज गुरव दिग्दर्शीत इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांचा वर्षाव परीस्थितीवर कष्ट व जिद्दीने मात करत घडला इंटरनॅशनल फालमफोक

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 26, 2023
in मनोरंजन
0
अकलूज येथील प्रा. धीरज गुरव दिग्दर्शीत इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांचा वर्षाव परीस्थितीवर कष्ट व  जिद्दीने मात करत घडला इंटरनॅशनल फालमफोक
0
SHARES
801
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथील प्रा. धीरज गुरव दिग्दर्शीत इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांचा वर्षाव

परीस्थितीवर कष्ट व जिद्दीने मात करत घडला इंटरनॅशनल फालमफोक

अकलूज ((गणेश जाधव )परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास कोणतेही ध्येय साध्य होतेच हे सिद्ध करून दाखवले आहे अकलूजच्या प्रा.धीरज गुरव याने..धीरज याने माणूस परिस्थितीने गरीब असला तरी चालेल; मात्र तो विचाराने कधीच गरीब असू नये.आपल्या कडे काय नाही यापेक्षा आपल्याजवळ काय आहे याचाच विचार करून त्यातून सकारात्मक विचार करीत *इंटरनॅशनल फालमफोक* या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलेला धीरज हा अकलूज मध्ये राहत आहे.धीरजला अगदी लहानपणापासून नृत्य कलेची आवड आहे. इयत्ता पाचवी पासून त्याने 125 हुन अधिक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने आपले संपूर्ण शिक्षण नृत्य कलेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातूनच पूर्ण केले. धीरजचे वडील श्री.दिलीप गुरव हे व्यवसायाने टेलर आहेत; मात्र वडिलांच्या मेंदूला रक्त पोहचत नसल्याने वडील गेली 23 वर्षे कोणतेही काम करत नाहीत ते घरीच असतात.मग संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ती धीरज यांच्या आई आणि आज्जीवर. आई सौ.पुष्पा गुरव गेली 23 वर्षें अकलूज मधील शिवशंकर बझार या ठिकाणी स्वच्छतेच काम करत. धीरज इयत्ता १२ वी पासून अकलूज परिसर व माळशिरस आणि इंदापूर तालुक्यातील शाळांना नृत्य दिग्दर्शनाचे काम करत आहे.आदरणीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळ समूह नृत्य स्पर्धा, शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित गौरव मराठी मातीचा,गौरव भारतीय लोककलेचा च्या निमित्ताने तालुक्यातील सर्व शाळांना नृत्य दिग्दर्शन करण्याचे काम केले आहे.अगदी खेडेगावातील आतापर्यंत 1500 हुन जास्त विद्यार्थ्यांना नृत्य आणि प्रसंगानुरूप अभिनय शिकवण्याचे काम केले आहे.प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेत नृत्य आणि अभिनय शिकवत असतानाच त्यांच्यातील दिग्दर्शक होण्याची आवड निर्माण झाली आहे. पुढे त्याने बी.कॉमच्या शिक्षणासाठी अकलूज मधील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व तिथून तो कलाकारांचे आश्रयस्थान धैर्यशील मोहिते पाटील, तसेच प्रा.विश्वनाथ आवड सर यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर युवा महोत्सवात वेगवेगळ्या कला प्रकारात सहभागी झाला. सोलापूर युवा महोत्सवात एकांकिका,मुकनाट्य,लघुनाट्य,लोकनृत्य, या कलाप्रकारात घवघवीत यश संपादन करत उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट लोकनृत्य हे पुरस्कार त्याने मिळवले.तिथून पुढे उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉमला प्रवेश घेतला.व एम.कॉम उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच पहिल्याच प्रयत्नात प्राध्यापक होण्यासाठी लागणाऱ्या SET परीक्षेत सुद्धा यश मिळवले. सध्या प्रा.धीरज गुरव हे शंकरराव मोहिते महाविद्यालयातच वाणिज्य विभागात काम करत आहेत. इंटरनॅशनल फालमफोक चित्रपटाचा मुख्य नायक योगेश खिलारे हा त्याचा लहानपासूनचा आणि जिवलग मित्र आहे. दोघेही लहानपणापासून नृत्य स्पर्धेला जात असत. २०१४ मध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक श्री.नागराज मंजुळे अकलूज मध्ये महाविद्यालयात आले असताना धीरज नागराज यांना भेटला. तेव्हाच धीरजने प्रखरतेने ठरवले की आपण चित्रपट तयार करूया..कारण धीरज हा नागराज मंजुळे यांना आपला आदर्श दिग्दर्शक मानतो.मग योगेश आणि धीरज यांनी लेखक लारा साळुंखे सरांची भेट घेतली. आता खरा प्रवास सुरु झाला होता तो “इंटरनॅशनल फालमफोकचा!” धीरज,योगेश आणि लेखक साळुंखे सर हे गेल्या 10 वर्षांत इंटरनॅशनल फालमफोकच्या निमित्ताने मुंबई,सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 40 हुन जास्त निर्मात्यांना भेटले. काही निर्माते हा चित्रपट करू म्हणायचे..काहीजण नंतर करू म्हणायचे…तर काहीजण लगेच चालू करू म्हणायचे; पण प्रत्यक्ष पैसे कोणी देत नव्हते. धीरज आणि योगेश ने ठरवले की आता जर आपण अनेक निर्माते शोधत बसलो तर अजून पुढील १०,१५ वर्षं आपल्याला असच फिरत बसावं लागेल मग दोघांना एक कल्पना सुचली की आपण आपल्या जवळचे पैसे घालू आणि जवळच्या मित्रांकडून वर्गणीच्या स्वरूपात पैसे मागून बघू! या नुसार वर्गणी करून व स्वनिर्मितीतुन हा चित्रपट बनवण्यात आला.चित्रपट बनवताना जवळचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी खूप मोलाची मदत केली. इंटरनॅशनल फालमफोकचे सर्व श्रेय धीरज त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना देतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,पुणे येथे धीरज आणि योगेश या दोघांच्या नावातुन एक-एक अक्षर घेत “धीयो फिल्म्स” ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. त्यातूनच तयार झाला तो “इंटरनॅशनल फालमफोक” हा चित्रपट. सर्वजण विचारतात “फालमफोक” म्हणजे काय ? तर धीरज म्हणाला “फालमफोक” या शब्दाचा अर्थ गुप्त राहणंच चांगलं आहे.ज्यावेळी सर्वजण चित्रपट पाहतील त्यावेळी त्यांना या फालमफोक शब्दाचा अर्थ समजेल. चित्रपट तयार करताना अनेक आर्थिक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करत आता चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील भव्य दिव्य असा “२५ वा सांस्कृतिक कलादर्पण मराठी चित्रपट पुरस्कार २०२३,मुंबई” येथील महोत्सवात एकूण ४२ मराठी चित्रपटातून अंतिम १० चित्रपटात “इंटरनॅशनल फालमफोक” हा चित्रपट निवडला गेला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाला “बाबुराव पेंटर स्मरणार्थ, कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवात” दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये उत्कृष्ट अभिनेता पदार्पण : योगेश खिलारे, व उत्कृष्ट विनोदी अभिनेता : तानाजी गळगुंडे याला पुरस्कार जाहीर झाले. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कृत “९ वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात” सुद्धा हा चित्रपट दाखल झाला आहे. आणि लवकरच हा चित्रपट “६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,दिल्ली” येथे सहभागी होणार असून अकलूज परिसरातून धीयो फिल्म्स निर्मित इंटरनॅशनल फालमफोकचे दिग्दर्शक प्रा.धीरज गुरव व संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. कारण अतिशय सामान्य परिस्थितीतील तरुण व नवख्या दिग्दर्शकाने समाजातील नवोदित दिग्दर्शकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

प्रा. दिग्दर्शक धीरज गुरव. अकलूज.
🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
Next Post
सिद्धेश्वर प्रशाला त शेटफळ शाळेमध्ये एस एस सी विद्यार्थ्यांचा शुभचिंतनाचा कार्यक्रम संपन्न!

सिद्धेश्वर प्रशाला त शेटफळ शाळेमध्ये एस एस सी विद्यार्थ्यांचा शुभचिंतनाचा कार्यक्रम संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In