मंगळवेढा /प्रतिनिधी भैय्या खिलारे :
रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर प्रशाला त. शेटफळ या शाखेमध्ये एस एस सी विद्यार्थ्यांचा शुभचिंतनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला .कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष त .शेटफळ च्या सरपंच सो नूतनताई मासाळ होत्या तर प्रमुख पाहुणे मांजरी हायस्कूल मांजरीचे बनसोडे सर, एडके सर होते. भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन, आपल्या शाळेचे हे नाव उज्वल करावे असे आवाहन बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी मनोगते व्यक्त करताना विद्यार्थ्यांनाही भावना अनावर झाल्या होत्या. प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंगराव माने यांनी अनेक गोष्टींना उजाळा देत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य सुनील पाटील , उपसरपंच काशिलिंग चौगुले ज्येष्ठ मार्गदर्शक मारुती मासाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर, साक्षी आरे यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वरी मासाळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौदागर सर , बारले सर, धंगेकर सर ,गोरे सर ,कांबळे सर ,दादा मासाळ यांनी परिश्रम घेतले .







