नऱ्हे , पुणे येथे डॉ.पवार मल्टी स्पेशालिटी क्लिनिक अँड होमिओपॅथिक सेंटरच्या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न….





नऱ्हे, पुणे येथे होमिओपॅथी तज्ञ डॉ. दयानंद पवार (एम डी.) व डॉ. तृप्ती दयानंद पवार (बी. एच्. एम. एस.) यांच्या डॉ. पवार मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँड होमिओपॅथिक सेंटरच्या चौथ्या शाखेचा उद्घाठण समारंभ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड व श्रीमती पुष्पावती यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे, कॅपिटल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. राजकुमार अंबड,होमिओपॅथी तज्ञ डॉ. महेश पाटील, डॉ.किरण घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सेंटर मध्ये खालील आजारासाठी होमिओपॅथिक उपचार होणार असून यामध्ये मुख्यत्वे करून जुनाट सर्दी, संधिवात , मुतखडा, मुळव्याध, सोरायसिस , सांधेदुखी , गाऊट , मधुमेह, दमा, बालदमा , नपुंसक, पीसीओडी ,अल्सर, थायरॉईड, फिट येणे, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, कावीळ, वंध्यत्व, टॉन्सिल्स, नैराश्य, मानसिक असंतुलन, वजन वाढवणे, वजन कमी करणे ,ब्लड प्रेशर, डोकेदुखी, पाळीच्या तक्रारी, झोपेच्या तक्रारी, चिकन गुण्या, त्वचाविकार, गजकर्ण इसब ,नायटा, कोड, केसांच्या तक्रारी, मुरमे, कर्करोग ,प्रोस्टेट ग्रंथीला सूज येणे ,अर्धशिशी, कुरूप ,भगेंन्द्र, नागिन, एलर्जी ,बुटकेपणा ,चामखीळ, व्यसनमुक्ती( दारू ,तंबाखू, गुटका इ.), मतिमंदता व गतिमंद, ऑटिझम, किडनी फेल्युवर इत्यादी आजारावर सदर सेंटरमध्ये उपचार होणार असल्याचे सेंटरचे सर्वेसर्वा डॉ. दयानंद पवार व डॉ. सौ. तृप्ती पवार यांनी सांगितले. होमिओपॅथिक उपचाराने आजार हा मुळापासून बरा होतो, औषधाचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मानसिक व शारीरिक आजारावर होमिओपॅथिक औषधोपचार उपयुक्त असून अल्प व जुनाट आजारांमध्ये होमिओपॅथि ही प्रभावी असल्याचे व इतर औषधोपचाराच्या तुलनेत होमिओपॅथिक औषधोपचार हे स्वस्त असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.







