*अमृतजल अभियान अंतर्गत अकलुज येथे निरंकारी मिशनकडून नीरा नदीपात्राची स्वच्छता.*
संग्रामनगर दि.२६ (संजय लोहकरे यांजकडून)संत निरंकारी मिशनच्या वतीने सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या संकेल्पनेतुन स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृतजल अभियान अंतर्गत संत निरंकारी मंडळ शाखा अकलुज यांच्या वतीने शिवसृष्टी किल्ला परिसरातील नीरा नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली. सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने व स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरंकारी मिशनच्या माध्यमातून देशभर अमृतजल अभियान अंतर्गत सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते.दि.२६ फेब्रुवारीला दिल्ली येथे सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत अभियानास प्रारंभ झाला तर याच दिवशी एकाच वेळी देशभरातील २७ राज्यात ७०० शहरात ११०० ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले होते.पाणवठ्याच्या परीसरातील स्वच्छता करुन पाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न नागरिकांनमध्ये जनजागृती करणे या उद्देशाने “स्वच्छ जल,स्वच्छ मन” हा नारा देत अमृतजल अभियान राबवण्यात आले. अकलुज येथील शिवसृष्टी किल्ला परिसरातील निरा नदीच्या पात्रातील गवत,प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या,काटेरी झुडपे इत्यादी कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.यावेळी अकलुज व पिलीव शाखेचे बहुसंख्य निरंकारी अनुयांयी व सेवादल यांनी सहभाग घेतला होता.






