गौतमी पाटील हिने लावणी जोपासली की बदनाम केली
बी टी शिवशरण
सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटील ही लावणी मुळे तमाम युवकांना जाम आवडू लागली आहे तिच्या लावणी कार्यक्रमाला सगळीकडे हजारो प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत प्रश्न असा आहे की गौतमी पाटील हिच्यामुळे लावणीला दिवस चांगले आले आहेत का लावणीला लोकांश्रय मिळत आहे का मग तीला एवढा उदंड प्रतिसाद का मिळतोय नव्या लावण्या आल्या आहेत का किंवा गौतमी मुळे लोकांची रुची दर्जा वाढला का हे मुद्दे विचारात घेतले तर गौतमी पाटील हिच्याकडे कोणतीही पारंपरिक लावणीची बाजू नाही पारंपरिक वेशभूषा नाही लावणीचे सौंदर्य घरंदाजपणा नाही लावणीची अदाकारी चे अंग नाही निव्वळ छचोरपना आहे उडत्या चालीची आंबटशौकीन दर्जाहीन शैलीतील सुमार लावण्या अश्लील हावभाव नखरेल चाळे यामुळे तीला पहाण्यासाठी अश्लील चाळे बघण्यासाठी त्याच लायकीचे दर्जाचे तरुण प्रेक्षक गर्दी करत आहेत हल्ली गावोगावी कार्यकर्त्यांचे नेत्यांचे वाढदिवस यात्रा जत्रा यांना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवण्याची किंवा तीलाआणण्याची प्रतिष्ठा समजू लागले आहेत त्यामुळे अस्सल लोककला पारंपरिक लावण्या त्या सादर करणारे कलावंत मागे पडू लागले असल्याची भीती निर्माण झाली आहे अचकट विचकट अंगवीक्षेप अश्लील अ दा करी संपूर्ण पाठ उघडी मराठमोळी पद्धतीची नऊवारी साडीची अवहेलना बदनामी होईल अशी रेडिमेड नऊवारी साडी नेसून लावणी सादर करून केवळ आणि केवळ पैसा हाच एकमेव उद्देश तिचा आहे त्यामुळे खरे कलाकार उपेक्षित होत आहेत बदनाम होत आहेत लावणीचा पारंपरिक बाज काय असतो लावणी कशी सादर केली जाते जुन्या नव्या लावण्या कश्या सादर केल्या जातात ती सादर करत असताना पारंपरिक बाज पारंपरिक नऊवारी ढोलकी पेटी मुजरा गौळण छक्कड बैठकीची लावणी अदा करी कशी असावी हे पहायला अनुभवायला शिकायला मिळाले ते अकलूजला सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील जयंती समारोह समिती यांचे वतीने दर वर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय लावणीनृत्य स्पर्धा होत होत्या पंचवीस वर्षे स्पर्धा घेण्यात आल्या या लावणीनृत्य स्पर्धेत सहभाग मिळणे किंवा भाग घेणे कलावंत यांच्या करिता प्रतिष्ठा सन्मान समजले जायचे शिस्त सन्मान प्रतिष्ठा दर्जा ही अकलूजला अनुभवायला मिळाली दरवर्षी लावणी कलें साठी योगदान देणाऱ्या नामवंत लावणी कलावंत यांना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सन्मान पुरस्कार रोख रक्कम असलेला पुरस्कार दिला गेला जयंती समितीचे वतीने कलावंत यांचा अपघात विमा कलावंत यांचे मुलांचे शिक्षण यासाठी आर्थिक सहकार्य दिले गेले जे शासन करू शकले नाही ते अकलूजला जयंती समारोह समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहितेपाटील यांनी केले लावणी कला जोपसणाऱ्या थोर कलावंत यमुनाबाई वाईकर गुलाब बाई संगमनेरकर रोशन सातारकर विठाबाई नारायणगावकर यासिन म्हा बरी या जुन्या कलावंत यांना गौरवण्यात आले तसेच नव्या दमातील राजश्री काळे नगरकर वैशाली जाधव परभणीकर मीना अमीना परभणीकर प्रभा छाया पंढरपूकर बरखा अप्सरा जळगावकर हे कलावंत पहाता आले त्यांनी मेहनत घेऊन अकलूजला स्पर्धेत भाग घेऊन आपली कला सादर केली त्यामुळे तमाशा कलेची नारायणगाव जरी पंढरी असली तरी अकलूजच्या लावणी नृत्य स्पर्धेने अकलूज हीच लावणी कलेची पंढरी मानली अकलूज लावणी स्पर्धेने महाराष्ट्रात लावणीला प्रतिष्ठा वैभव सन्मान लोक आश्रय मिळाला इथे लावणी सादर करणाऱ्या लावण्यावती बरोबरच वादक गायक यांचाही सन्मान केला अकलूजला लावणी स्पर्धा पाहण्यासाठी राज्यभरातून अभ्यासक परीक्षक आले अनेक नामवंत अभिनेते कलाकार आले त्यामुळे लावणी बहारली वाढली पण ज्यावेळी अकलूजला लावणी पंढरी म्हणून नावालौकिक मिळाला त्यावेळी गौतमी पाटील हिचा जन्म झाला होता की नाही माहित नाही पण ती आज लावणीचा बाजार मांडून ही कला बदनाम करत आहे युवा पिढीला चुकीच्या मार्गाने नेत आहे दुर्दैव असे की तीला प्रतिष्ठित म्हणून बोलावले जाते तिचे कार्यक्रम प्रमुख आकर्षण म्हणून ठेवले जातात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे







