• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त अकलूज येथे दिल्ली च्या धर्तीवर अभूतपूर्व सोहळा13चित्ररथातुन 25हजार कलाकारांचा सहभाग.नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 17, 2022
in देश-विदेश
0
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त अकलूज येथे दिल्ली च्या धर्तीवर अभूतपूर्व सोहळा13चित्ररथातुन 25हजार कलाकारांचा सहभाग.नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
0
SHARES
317
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त अकलूज येथे दिल्ली च्या धर्तीवर अभूतपूर्व सोहळा.18चित्ररथातुन 25हजार कलाकारांचा सहभाग.नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

अकलूज(गणेश जाधव.)भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त अकलूज येथे अमृत महोत्सव समितीच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील विविध क्रांतीकारी घटना, प्राचीन भारत ते आधुनिक भारताचे 13 चित्ररथातून २५ हजार कलाकारांनी सादरीकरण केले. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ, शिवरत्न शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्यं दिन अमृत महोत्सव समितीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अकलूज येथे आयोजन करण्यात आले होते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री नऊ वाजता या भव्यदिव्य कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयर्सिह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अग्रभागी घोडस्वारांचे पथक, घोष पथक व तिरंगा पथकाने प्रथम प्रानवंदना दिली. त्यानंतर जिल्हा परिषट प्राथमिक शाळांनी तयार केलेला ‘तिरंगा चित्ररथ ‘शकरराय मोहिते महाविद्यालवाने महात्मा गांधींच्या चले जाव चळवळीचे त्या कार्यातील दर्शन घडविले. सदाशिवराव माने विद्यालयाने ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा ‘या सुभाषचंद्र बोस यांच्या घोषणेसह प्रत्यक्ष आझाद हिंद सेनाच अवतरवली’. तर महर्षी प्रशालेने ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा घटनाक्रम दाखवणारा ‘क्रांतिकारकांचा रथ , शिवरत्न शिक्षण संस्थेने स्वातंत्र्यसंग्रामातील महिलांचे योगदान दर्शविले. यापाठोपाठ शिवामृतचा ‘दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रगती दर्शविणारा ‘दुग्धक्रांती रथ, शेती तंत्र विद्यालयाचा पारंपरिक व आधुनिक शेती रथ तर अकलूज नगरपरिषदेचा’ पर्यावरण रक्षक रथ’ त्यानंतर मुस्लिम बांधवांनी केलेला ‘कारगिल युद्ध विजयी देखावा, फार्मसी महाविद्यालयाने संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘तेजस विमान’ साकारले. सहकार महर्षी अभियांत्रिकी कॉलेजने मिसाईल मॅन अब्दुल कलाम आणि भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले मिसाईल व लॉकेट लाँचर, सहकार महर्षी साखर कारखान्याने केलेली अति भव्य ‘विक्रमादित्य युद्धनौका ‘आणि हजारो मशालधारकांनी आसमंत उजळल्यानंतर रत्नाई कृषी महावीद्यालयाच्या ‘अमर जवान ज्योती रथाचे उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’ च्या जयघोषाने स्वागत केले.त्याचबरोबर हलगी पथक, लेझीम, गझी ढोल या सर्व पथकांच्या पारंपरिक वेशभूषाने प्रेक्षकांची मने जिंकली. ही अतिभव्य तिरंगा रॅली सदुभाऊ चौकातून गांधी चौक, जुने एसटी स्टँड मार्गे सदुभाऊ चौकातून विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आली.या सर्व चित्ररथांचे स्वागत करण्यासाठी अकलूज मधील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फ ठिकठिकाणी फलक लावून विद्युत रोषणाई केली होती. तर हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती.सदर रॅली क्रीडा संकुल याठिकाणी आल्यानंतर अकलूज आणि परिसरातील शहीद जवानांच्या वारसांचा यथोचित सन्मान करण्यात आला.सर्व पथके पोहोचल्यानंतर सकाळी बारा वाजता राष्ट्रगीत, ध्वजगीत होऊन प्रचंड नयनरम्य अशी फटाक्यांची आतिषबाजी होऊन या कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते -पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,सुलक्षणादेवी मोहिते -पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते -पाटील,कांचलमाला मोहिते -पाटील, जि. प. सदस्या व डॉटर मॉम फौंडेशन च्या अध्यक्ष शितलदेवी मोहिते -पाटील, ऋतुजादेवी मोहिते -पाटील, सुमित्रा खानविलकर,अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने -पाटील,अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील,माळशिरस पंचायत समिती चे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, जि. प. सदस्या व प्रताप क्रीडा मंडळ च्या अध्यक्ष स्वरूपाराणी मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते -पाटील तसेच अकलूजसह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून सुमारे एक लाख पेक्षा ही अधिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.जे नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यासाठी यूट्यूब वरून लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.त्यामुळे लाखो नागरिकांनी हो सोहळा घरबसल्या पाहून आनंद घेतला.

चौकट :-

जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांच्या अचूक नियोजनाचे दर्शन या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अकलूजकरांना पाहायला मिळाले अतिशय शिस्तबद्ध आणि परफेक्ट प्लॅनिंग असणारा हा कार्यक्रम ठरला. रॅलीमध्ये पथसंचलन, अश्व पथक आणि जिवंत देखावे याशिवाय ढोल लेझीम यामुळे अवघे वातावरण देशभक्तीमय झाले होते. यामुळे प्रत्येकाच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण होताना दिसत होते. असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केल्याबहल जयसिंह मोहिते पाटील (बाळदादा )यांचे उपस्थितांनी आभार मानले.

चौकट :-सदर कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकलूज उप विभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि पोलीस मित्र परिवार चे अध्यक्ष रमेश सुरवसे –पाटील यांच्या पोलीस मित्रासह चोख बंदोबस्त ठेवला होता.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
देश-विदेश

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

July 23, 2026
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे
देश-विदेश

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे

July 16, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’

July 15, 2026
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
Next Post
सोशलमीडीयावर ही पोस्ट तुफान वायरल होतेय.

सोशलमीडीयावर ही पोस्ट तुफान वायरल होतेय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In