सोशलमीडीयावर ही पोस्ट तुफान वायरल होतेय.
अकलूज (प्रतिनिधी )गेल्या काही दिवसापासून एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान वायरल होत असून, या पोस्ट बद्दल माळशिरस तालुक्यात सध्या तर्क -वितर्क लढविले जातं आहेत.एक आटपाट नगर असते. त्या गावात एक मोठा शेतकऱ्यांने त्याच्या शेतात बाहेरून सालाने गडी आणलेला असतो. सालगडी मालकांच्या रानात घर बांधून राहत असतो,सालगड्याने काही भटक्या कुत्र्यांना खरकटा तुकडा भाकर टाकलेला असतो,त्या टॉमी कुत्र्याला सालगड्याचा लळा लागतो, तुकड्यांच्या अपेक्षेने कुत्रा सालगड्याच्या घराची राखन करत असतो.एके दिवशी शेतीचा मालक रानात फेरफटका मारायला शेतात येतो,तेव्हा सालगड्याने पाळलेला कुत्रा शेतमालकावरच भुकायला लागतो. तेव्हा शेतमालक सालगड्याच्या देखत कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालतो.तेव्हा टॅमीला पण कळते आपण ज्यांच्यावर भुंकतो तो शेताचा खरा मालक आहे. सालगडी सुद्धा टॅमीच्या पेकाटात लाथ पडल्यावर मालकाला म्हणतो टॅम्या जरा आगावच झाला. बरे झाल लाथ घातली.. आता ही पोस्ट कोणी वायरल केली, हे माहित नाही. पण सध्या सदर पोस्ट तुफान वायरल होत आहे. आजकाल आपल्या सवंग प्रसिद्धी साठी कोण काय बोलेल याचा काही नेम नाही. आपण काय बोलतोय, कोणाविषयीं बोलतोय याचे भान न राहिल्यामुळे काहीजण वाट्टेल ते बरळत आहेत.यात दुर्देवाची गोष्ट म्हणजे काही सुपारी बहाद्दर पत्रकार मात्र कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता केवळ आपल्या यू ट्यूब चॅनेलवर अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित करून केवळ व्यु्वज वाढविण्यासाठी हा खटाटोप करीत आहेत.ज्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या गावात देखील कोणी जवळ करीत नाहीत. अशा व्यक्ती काही पत्रकारांना जवळ करून वाट्टेल ते बरळत आहेत.







