*अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने एन.डी.आर.एफ.जवानांचा सत्कार*
संग्रामनगर दि.१७ (केदार लोहकरे याजकडून)भारतात सर्वत्र अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा या घोषणेने सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस सी चांडक यांचा हस्ते झाले.जिल्हा पोलीस बँड पथक मार्फत राष्ट्रगीत सादर करणेत आले.अमृत महोत्सवी सोहळा वेळी फुलांची रांगोळी,तिरंगा कलर मधील फुगे सजावट केलेने जिल्हा न्यायालयमध्ये देशभक्तीपर उत्साहाचे वातावरण झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मदतीला एन.डी.आर.एफ. जवानांची टीम कोल्हापूर येथे आलेली आहे.एन.डी.आर.एफ.टीम ने कोल्हापूरकराना दिलेली सेवा,तसेच जवान करत असलेल्या देशसेवा याची कृतज्ञता म्हणून आज अमृत महोत्सवी स्वतंत्रदिना निमित्त 25 एन.डी.आर.एफ.जवानांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.सदर सत्काराला उत्तर देताना एन.डी.आर.एफ.टीमचे ब्रजेश कुमार यांनी असे म्हणाले कोल्हापूर ही ऐतिहासिक भूमी आहे,या भूमीला शाहू महाराजांचे विचार आहेत या ठिकाणी आम्हाला देशसेवा करायला मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. सदर कार्यक्रमास एन.डी.आर.एफ.टीममधून प्रामुख्याने निरी.बृजेश कुमार,सउप निरी शरद पाटील,जवान रवि हिरलकर,किरण सोनवने,निवृति बारड,निलेश जाधव, नवनाथ मगदुम,उमेश चव्हान,निलेश सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा बार असो अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,अॅड.सुधीर चव्हाण,अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख,अॅड. संदीप चौगुले,बार कौन्सिलचे माजी अध्यक्षअॅड.महादेवराव अडगुळे,अॅड.शिवाजीराव चव्हाण,अॅड.संपतराव पवार,अॅड.प्रशांत चिटणीस,जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश वर्ग व बार असो वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.








