*कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण.*————————————-संग्रामनगर दि.१७ (केदार लोहकरे याजकडून)कोडोली (ता.पन्हाळा)येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना आज स्वातंत्र्यदिनी दिवशी माजी सुरेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थींना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थी-शिक्षक अमोल पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला श्री.गायकवाड यांच्यासोबत प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते देखील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. निबंध लेखन स्पर्धेतील अनुक्रमे पाहिल्या चार क्रमांकाचे विजेते विद्यार्थी-शिक्षक पुढीलप्रमाणे : अमोल पांडुरंग पाटील (प्रथम क्रमांक),नवरंग प्रभाकर कुलकर्णी(द्वितीय क्रमांक),अनुष्का अभिजित खंबाळे (तृतीय क्रमांक), सोनाली सुनील पाटील (उत्तेजनार्थ) वरील विजेत्यांना अनुक्रमे पाच शे रूपये,तीन शे रूपये,दोन शे रूपये आणि शंभर रूपये या रोख रकमेसह प्रत्येकी प्रमाणपत्र देण्यात आले. पुढील विजेत्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वैशाली हिरामण कोकणी,ऋतुजा सीताराम हुजरे,प्रियांका हरीश मोहिते,पूजा सुबेद मोहिते,सुनीता नामदेव पाटील,भाग्यश्री वसंत किटे आणि धैर्यशील अशोकराव पाटील. ध्वजारोहण समारंभाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रकाश बंडू बुगले व विद्यार्थिनी ऋतिका देशपांडे यांनी केले. प्राध्यापिका सौ.एस.के.पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ध्वजवंदन करण्यासाठी बी.एड.महाविद्यालयात प्राध्यापक, ग्रंथपाल डी.डी.पाटील,प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी-शिक्षक तसेच यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बी.एड.महाविद्यालयाने”पक्ष्यांसाठी घरटी” निबंध लेखन स्पर्धा आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरणार्थ कॉलेजमधील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्या घरातील झेंडावंदन करतानाचा छायाचित्रांचा अल्बम हे उपक्रम राबविले आहेत.








