*ह.भ.प.नागनाथ भगवान नवगिरे यांचे दुःखद निधन.*
संग्रामनगर दि.१७ (प्रतिनिधी)अकलूज येथील ह.भ.प.नागनाथ भगवान नवगिरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते ५४ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,एक मुलगा,जावाई,नातवंडे आहेत.ते वारकरी संप्रदायाचे व किर्तनकार आसल्यामुळे तालुक्यात सर्वांच्या परिचयाचे होते गेली ३० वर्ष त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पायी वारी केली आहे.







