*कोळेगांव येथील बळीराजाने ट्रॅक्टर रॅली काढून स्वतंत्राचा अमृतमहोत्सव साजरा केला.*
संग्रामनगर दि.१७ (केदारलोहकरे याजकडून)कोळेगांव (ता.माळशिरस)येथील शेतक-यांनी एकत्र येवून भारतीय स्वतंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त गावातून भव्य ट्रॅक्टर रॅली काढून भारताचा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माळशिरस तालुक्यात शेतक-यांनी प्रथमच ट्रॅक्टर रॅली काढली आसल्यामुळे या शेतकरी वर्गाची तालुक्यात विशेष चर्चा होत होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले असल्याने संपूर्ण देशात विविध उपक्रम साजरे होत असताना कोळेगांव (ता माळशिरस) येथे गावातील 100 युवक शेतकऱ्यांनी हि रॅली काढून भारताचा स्वतंत्र दिन एक वेगळ्या अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला. कोळेगाव येथील श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयाच्या पटांगणावर गावातील सर्व तरुण ट्रॅक्टर मालक व चालक यांनी एकत्रित येत ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली.हायस्कूलपासून सुरुवात झालेल्या ट्रॅक्टर रॅली माऊली नगर,सटवाई मळा,मराठी शाळा,फळवणी शिव ते सांगोला अकलूज रोड,महुद शिव,दुपडे वस्ती अशी रॅली काढली. स्वयंमस्फूर्तीने युवक शेतकरी वर्गाने या ट्रॅक्टर रॅलीमध्ये देशभक्तीपर गीते लावून नागरिकांची देशभक्ती जागरूक करण्याचे काम करण्यात आले.त्यामुळे कोळेगांवाच्या ग्रामस्थातून या रॅली बद्दल दिवसभर चर्चेचा विषय बनला होता. हि रॅली यशस्वी करण्यासाठी कोळेगांव येथील युवक कार्यकर्ते संग्राम दुपडे,नितीन सावंत,नामदेव सावंत,दत्तात्रय दुपडे,अक्षय दुपडे यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








