• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून अकलूजचे सुपुत्र शहीद जयहिंद मस्के यांचे स्मारक उभे करावे.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 12, 2022
in देश-विदेश
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून अकलूजचे सुपुत्र शहीद जयहिंद मस्के यांचे स्मारक उभे करावे.
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून अकलूजचे सुपुत्र शहीद जयहिंद मस्के यांचे स्मारक उभे करावे.

अकलूज (गणेश जाधव )15ऑगस्ट 1980रोजी रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कव्हे येथील धोंडीराम व कस्तुराबाई मस्के यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आले. त्या दिवशी संपूर्ण भारतभर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. उपजतच अंगी देशप्रेम असलेले धोंडीराम मस्के यांनी आपल्या बाळाचे नाव ‘जयहिंद ‘असे ठेवले. कालांतराने तो आपल्या आई -वडिलां बरोबर वेळापूर येथे आला. त्याला सुनीता नावाची एक मोठी बहीण. सुनीता त्याला लाडाने पिंटू म्हणायची. पिंटू चे शालेय शिक्षण वेळापूर येथील जि. प. शाळेत झाले. सातवी पर्यंत चे शिक्षण वेळापूर येथेच झाले.पिंटू चे वडील पाटबंधारे खात्यात नोकरी करीत होते. त्यांची अकलूज येथे बदली झाल्यानंतर ते सहकुटुंब अकलूजला राहायला आले.प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आठवी साठी पिंटू ने सदाशिवराव माने विद्यालयात प्रवेश घेतला. जयहिंद माने विद्यालयात शिकू लगला. आपण इतर मित्रा पेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवायचे असे त्याला मनोमन वाटत होते. त्याला अगदी लहानपणा पासूनच देशाबद्दल खूप प्रेम वाटायचे. देशभक्ती गीतांची त्याला विशेष आवड होती.त्याला देश भक्तीवर आधारित असलेले चित्रपट खूप आवडायचे. चित्रपटातील पोलीस, त्यांची रुबाबदार वर्दी, चित्रपटातील फायटिंग याचे त्याला खूप आकर्षण वाटायचे. तो जस जसा मोठा व्हायला लागला. तस तस पोलीस इन्स्पेक्टर होण्याचं त्याच स्वप्न वाढत गेलं.हे स्वप्न मनात बाळगून तो दहावी उत्तीर्ण झाला. दहावी पास झाल्यानंतर ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी सराव सुरु केला. त्यानंतर तो बारावी परीक्षा पास झाला. त्याची मोठी बहीण सुनीता डी. एड पास झाली होती. त्यातच सुनीता चे लग्न बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील अभिमान गायकवाड यांचे बरोबर जमले. आणि लग्न देखील मोठ्या थाटा माटात झाले.बहिणी चे लग्न झाल्यानंतर काही कालावधी नंतर वर्तमान पत्रात भरती ची जाहिरात आली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने भरती साठी अर्ज भरला. भरतीच्या दृष्टीने त्याने सर्व तयारी पूर्ण केली.भरती तळेगाव दाभाडे येथे होती. जयहिंद आपल्या आई -वडिलांचे आशीर्वाद घेऊन गेला. आणि तो पहिल्याच प्रयत्नात भरती झाला. जयहिंद केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी. आर. पी. एफ. ई )मध्ये भरती झाला. लहानपणा पासुन पाहिलेले स्वप्न 18-2-2001रोजी वयाच्या एकवीसव्या वर्षी पूर्ण झाले. त्यानंतर गुजरात मधील गांधीनगर येथे त्याचे ट्रेनींग पूर्ण झाले. त्यानंतर तो सुट्टी साठी गणवेश घालून अकलूजला परत आला.त्यानंतर सुट्टी संपल्यानंतर 111बटालियन सी कंपनी मध्ये तो सामील झाला.त्यानंतर काश्मीर मधील पुंछ सेक्टर येथे जयहिंद ची नेमणूक झाली. येथे आपल्या सहकारी मित्रां बरोबर तो रमला.25-8-2002ला तिसऱ्यांदा सुट्टी साठी अकलूजला परत आला. तो दहा दिवसाच्या सुट्टी साठी आला होता.काश्मीर मध्ये निवडणुका होणार होत्या. जयहिंद ला बंदोबस्त साठी बोलावण्यात आले.यापूर्वी दोन वेळा सुट्टीसाठी आला होता. त्यावेळी तो हसत -हसत सर्वांचा निरोप घेऊन गेला होता. पण यावेळी मात्र त्याचे डोळे पाणावले होते. त्याने आपल्या वडील, आई आणि बहिणीला सांगितले, मी दोन महिन्याची सुट्टी घेऊन दिवाळीला परत येतो. असे सांगितले. तो गेला. परंतु कुटूंबात मात्र सर्वांची घालमेल होत होती. सतत पिंटू चा रडवेला चेहरा समोर दिसत होता. ते पिंटू ची वाट पाहत होते. कारण दिवाळीत घर बांधायला सुरुवात करायची होती.शिवाय त्याचे लग्न जमायचे होते.आपल्या भावाचे आता लग्न होणार म्हणून सुनीता खूप खूश होती.20-10-2002श्री नगर मधील दलगेट चौक येथे जयहिंद ड्युटी वर होता. दुपारचे चार वाजले होते. रविवार चा दिवस होता. नेहमी या ठिकाणी 8ते 10जणांचा ग्रुप ड्युटी वर असायचा. पण या वेळी जयहिंद एकटाच होता. डोळ्यात तेल घालून तो आपली ड्युटी करीत होता. अचानक दूरवर त्याला संशयादस्पद हालचाल दिसली. जयहिंद सावध झाला. तो गट क्रूर अतिरेक्यांचा गट होता. जयहिंद वर त्यांनी गोळीबार सुरु केला. प्रतिउत्तर म्हणून जयहिंद ने देखील तुफान गोळीबार सुरु केला. जयहिंद एकाकी लढत होता.समोरून आलेल्या गोळ्या जयहिंद च्या शरीराला चाटून जात होत्या. परंतु तो डगमगला नाही. निकराने तो लढत होता. जयहिंद आक्रमक झाला होता. तो आपल्या जागेवरून तसूभर देखील हलला नाही. त्याचा तो अवतार पाहून अतिरेकी खवळले. ते अधिकच त्वेशाने गोळीबार करू लागले. तेवढ्यात जयहिंद ने अचूक नेम साधत गोळी झाडली. समोरचा अतिरेकी खाली कोसळला. ते पाहून अतिरेकी पुन्हा खवळले. जयहिंद पुन्हा गोळीबार करीत होता.इतक्यात एक गोळी वेगाने आली. आणि जयहिंद च्या डोक्यात घुसली. जयहिंद खाली कोसळला. जयहिंद अतिरेक्याशी लढता -लढता शहीद झाला.त्याचे पार्थिव अकलूजला आणण्यात आले. अकलूज ग्रामपंचायत ने सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये त्याचे पार्थिव ठेवून त्याची अंत्ययात्रा काढली. अंत्य यात्रे साठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. गावातील मुख्य रस्त्यावरून अंत्य यात्रा पहाटे 2-45वाजता अकलाई स्मशान भूमी येथे पोहचली. पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण करण्यात आले. वडील धोंडीराम मस्के यांनी आपल्या मुलाला अग्नी दिला. जवान आणि अकलूज पोलिसांनी बिगुल वाजवून मानवंदना दिली.आजमितीला या घटनेला तब्बल वीस वर्षें पूर्ण झाली आहेत. आज आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आज शहीद जयहिंद मस्के याचे वडील हयात नाहीत. निदान आईच्या हयातीत तरी शहीद जयहिंद मस्के यांचे स्मारक अकलूज परिसरात उभे राहावे. असे मनोमन वाटते.माळशिरस तालुक्यातील प्रशासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून अकलूजचे सुपुत्र शहीद जयहिंद मस्के यांचे स्मारक उभे करावे. हिच त्यांना खरी आदरांजली ठरेलं.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
देश-विदेश

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

July 23, 2026
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे
देश-विदेश

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे

July 16, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’

July 15, 2026
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
Next Post
मुतखडा आणि होमिओपॅथिक औषधोपचार… होमिओपॅथी तज्ञ डॉ.अजित नाळे..

मुतखडा आणि होमिओपॅथिक औषधोपचार... होमिओपॅथी तज्ञ डॉ.अजित नाळे..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In