मुतखडा आणि होमिओपॅथिक औषधोपचार… होमिओपॅथी तज्ञ डॉ.अजित नाळे..
आपल्या दैनंदिन कामाच्या गडबडीत तासनतास पाणी पिण्याचे प्रमाण कमी राहते, त्यामुळे अचानक तीव्र पोटदुखी, पाठीत दुखणे, उलटी मळमळ होते, लघवी होण्यास त्रास होणे, लघवी अडखळणे इ.तक्रारी होत असल्यास मुतखडा झाल्याचे समजावे.☆ मुतखडा होण्याची कारणे:1) पाणी किंवा पातळ पदार्थ कमी घेतल्यामुळे..2) मूत्रमार्गात जंतुसंसर्ग झाल्यामुळे क्षार जमा होऊन खडा बनतो.3) लघवीचे प्रमाण कमी झाल्याने, लघवीतील मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने.4) यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे.5) प्रेग्नेंसी मध्ये प्रोजेस्टेरॉन वाढल्याने लघवी कमी होऊन खडा तयार होतो.6) कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यामुळे..7) कुटुंबातील व्यक्तीस मुतखडा असण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती.☆ मुतखड्याचे प्रकार:1) कॅल्शियम ऑक्सलेट2) कॅल्शियम फॉस्फेट3) यूरिक ॲसिड4) स्टॅगहॉरन कॅल्क्युलाय..☆ मुतखड्याची प्रमुख लक्षणे:1) तीव्र प्रकारची पोटदुखी ,पाठदुखी2) उलटी, मळमळ3) ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत किंवा ओटी पोटात दुखणे4) जंतुसंसर्ग झाले असल्यास ताप थंडी वाजून येणे.5) लघवी अडखळणे.☆ मुतखडा तपासण्याच्या पद्धती:1) सोनोग्राफी2) एक्स-रे..3) एमआरआय☆ मुतखडा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:1) पाणी भरपूर पिणे2) लघवी तुंबून ठेवू नये3) पडलेला खडा तपासून घेऊन पथ्य पाळणे..होमिओपॅथिक औषधोपचार…1) बरबेरीस व्हलगॅरीस..मूत्रनलिका ते मूत्राशयापर्यंत वेदना होतात, मूत्रपिंडात आग व बुडबुडे आल्यासारखे होते, लघवी झाल्यानंतर थोडी शिल्लक आहे वाटणे, वारंवार लघवीला लागणे. लघवीला जळजळ होणे..2)लायकोपोडीयम :लघवी आल्यासारखे वाटणे, लघवीला कुंथावे लागणे, लघवी तुंबून राहणे, लघवी होण्याअगोदर पाठीत ठणका लागणे.लघवी झाले की ठणका थांबणे. लघवीतून तांबडी वाळू जाणे.जास्त करून उजव्या बाजूला मुतखडा असतो.रुग्णाचा स्वभाव काळजी करणारा,भित्रा असतो अशी लक्षणे दिसल्यास लायकोपोडीयम हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते.3) कँथरीस:लघवी होताना भाजल्यासारखी आग होते, कापल्यासारखे वाटते, लघवी थेंब थेंब होते, लघवीतून रक्त जाते.4) सर्सापरीला:लघवी होताना वेदना होतात त्यामुळे ओरडण्यास भाग पडणे, लघवी संपताना कळा येतात, बसलेले असताना लघवी गळणे, लघवी संपताना रक्ताचे थेंब पडतात, लघवीतून बारीक वाळू जाते.5) नक्स ओमिका : लघवीला होईल असे वाटते पण होत नाही, थोडी थोडी थेंब थेंब होते, लघवीतून रक्त जाते, पाठीवर झोपल्याने बरे वाटणे.रुग्णास डाव्या बाजूस दुखते, रुग्ण फार टापटीप व संवेदनशील,रागीट स्वभावाचा असतो अशी लक्षणे दिसल्यास नक्स ओमिका हे होमिओपॅथिक औषध फायद्याचे ठरते..6) ऑसिमम कॅन :मूत्राशयात खडा झाल्यामुळे वेदना होऊन उलटी मळमळ होते, लघवीतून रक्त जाते किंवा दाट पोवळलेली असते, लघवी पिवळसर असते, कस्तुरी सारखा वास येतो.7) परेरिवा ब्रेवा :लघवीला खूप कुंथावे लागते, ताकत लावावी लागते ,मूत्राशयापासून मांडीपर्यंत दुखते अशी लक्षणे दिसल्यास हे होमिओपॅथिक औषध फायद्याचे ठरते..या औषधा व्यतिरिक्त हायड्रानजिया,सरसापरीला, कल्केरिया का, बेलाडोना इ. होमिओपॅथिक औषधे मुतखडा या आजारावर उपयुक्त ठरतात सदर होमिओपॅथिक औषधे तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.
..डॉ.अजित माणिक नाळे..होमिओपॅथि तज्ञ सुमन होमिओपॅथिक क्लिनिक, पिंपळनेर या.माढा जि.सोलापूर







