मौजे खळवे ता. माळशिरस येथे अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त वार शुक्रवार दिनांक 12/8/2022 रोजी सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत कार्यालयापासून तिरंगा ध्वजासह संपूर्ण गावातून पदयात्रा रँलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. हलगी ,ढोल, ताशे आणि भारत माता की जय च्या घोषणाबाजीत संपूर्ण पदयात्रा उत्साहात पार पडली. पदयात्रेचे संपूर्ण नियोजन विजयराज वाहतूक संघाचे व्हाईस चेअरमन श्री. कांतीलाल भागवत पाटील , सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक तुकाराम मारुती प्रधाने ,विद्यमान सरपंच श्री अशोक वसंत कदम , उपसरपंच श्री. केशवराव पांडुरंग चोपडे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर आबसो प्रधाने यांनी केले.यावेळी माजी सरपंच आण्णासो कदम ,माजी उपसरपंच श्री. रेवन ननवरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरावर झेंडे कसे लावायचे याबाबत उपसरपंच श्री. केशवराव चोपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेश सकट आणि श्री. विनोद जाधव यांनी 15 ऑगस्ट नंतर सुस्थितित ठेवण्याचे किंवा ग्रामपंचायतला परत करण्याचे आवाहन केले.ग्रामसेवक श्री. सतीश गीते आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अवताडे सर यांनी हर घर तिरंगा मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे या वेळी सांगितले.









