*18 वर्षांवरील लोकांना मोफत मिळणार बुस्टर डोस*
नवी दिल्लीः केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. यामुळे आतापर्यंत बूस्टर डोस न घेतलेल्या कोट्यवधी जनतेला मोठा फायदा होणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक सरकारी रुग्णालयात लसीकरण 15 जुलैपासून पुढील 75 दिवस हा बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. देशातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात हा बूस्टर डोस दिला जाईल







