• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

खदान विरोधी संघर्ष सुरुच ठेवणार : विरोधकांचे डाव हाणुन पाडण्यासाठी सहकार्य करा- सैनु गोटा यांचे आवाहन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 21, 2022
in देश-विदेश
0
खदान विरोधी संघर्ष सुरुच ठेवणार : विरोधकांचे डाव हाणुन पाडण्यासाठी सहकार्य करा- सैनु गोटा यांचे आवाहन
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खदान विरोधी संघर्ष सुरुच ठेवणार : विरोधकांचे डाव हाणुन पाडण्यासाठी सहकार्य करा- सैनु गोटा यांचे आवाहन

गडचिरोली /चक्रधर मेश्राम (दि.२० मे) : बेकायदेशिर सुरजागड लोह खाणीच्या विरोधात ग्रामसभेच्या वतीने सुरु असलेल्या खदान विरोधी आंदोलनाला काही लोकांनी राजकिय व व्देषभावनेतुन मागील काही दिवसापासून फेसबुक वाट्सअप आणि पोर्टल सारख्या सोशल मिडीयावर सुरजागड लोहखाण विरोधी आंदोलन आणि आंदोलकांना सोशल मिडीयावर विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र ग्रामसभांनी सुरू केलेले खदान विरोधी आंदोलन अशा आरोपांनी थांबणार नसून ते अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समीतीचे प्रमुख सैनू गोटा यांनी पत्रकार परिषदेत दिली.एट्टापली येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पुढे ते म्हणाले की, ” आमच्या ग्रामसभानी फक्त सुरजागड नव्हे तर जिल्ह्यातील २५ जनविरोधी लोहखाणी कायम स्वरुपी रद्द करा” या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो ग्रामसभांच्या वतीने खदान विरोधी आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलन हे माझ्या एकट्यामुळे नसुन जनतेनी ग्रामसभांमध्ये ठराव करुन आणि लेखी निवेदन, तक्रारी, तसेच धरणे आंदोलन मोर्चा व इतर माध्यमातून प्रखर विरोध केला जात आहे. मात्र भांडवलदारांच्या आणि दलाल लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बळजबरीने सुरजागड येथे खाणीचे काम सुरु आहे.या बेकायदेशिर सुरु असलेल्या कामाला अडथळा होवु नये यासाठी भांडवलदारांनी आणि दलाल लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि काही अधिकारी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन आंदोलनाच्या स्थानिक नेत्यांनी पैसे घेवुन मॅनेज झाल्याची चर्चा पेरुन बदनाम करण्याचा नाहक प्रयत्न करण्यात येत आहे.माझ्या घरी पोलीस झडतीत पोताभर पैसे मिळाल्याची चर्चा सोशल मिडीयावर करण्यात आली. जर माझ्या घरी पोलीस झडतीत पोताभर पैसे मिळाले तर पोलीसांनी माझ्यावर कारवाही का केली नाही ? या बाबत आरोप करणाऱ्यांनी खुलासा करावा.स्थानिक आमदार हे खदान विरोधी आंदोलन करणाऱ्या ग्रामसभांचा विरोध करणारे असल्याने त्यांच्या मध्यस्थीने पैसे घेण्याचा आरोप हे हास्यास्पद आहेत. मी आजपर्यंत कोणत्याही कंपनी अथवा कोणत्याही आमदारांच्या मध्यस्तीने पैसे किंवा इतर कोणतेही सोई सुविधा घेतलेल्या नाही. मी पैसे घेतले असल्यास जे मध्यस्थी केले असे नमुद आहे त्यांनी जनतेसमोर खुलासा करावा.सुरजागड परिसरात संपुर्ण ग्रामसभा सुरजागड खदान कंपनीचा विरोध करित असतांना स्थानिक आमदारांच्या पक्षाचे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हे खदान विरोधी आंदोलनात सहभागी होत नाहीत. जे सहभागी होतात त्यांचा विरोध करतात आणि बदनामी करतात, याचे कारण काय आहे हे त्यांनी जनतेसमोर खुलासा करावा. मी ग्रामसभेचा नेता आहे. प्रचार न करता जिल्हा परिषद सदस्य म्हणुन भरघोष मतानी निवडुन आलो. माझी ग्रामसभा सक्षम आहे. मला कोणत्याही पक्षाची गरज नसतांना मी माझा मुलगा व मुलगी कोण्या राजकिय पक्षाकडून उभा करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ज्यांनी आरोप केला त्यांनी जनतेसमोर खुलासा करावा. मी आजपर्यंत सुरजागडसह जिल्ह्यातील अन्य २५ खदाणीचा विरोध करित आहे. खदाणीमुळे माझ्या आदिवासी बांधवांना होणाऱ्या अन्यायाबाबत व जल , जंगल , जमिन यांच्या होणाऱ्या नुकसानी बाबत मी नेहमी विरोध केला आहे आणि करत राहणार आहे आणि तो माझा हक्क आहे. आणि यासाठी जिल्हाभरातील ग्रामसभांनी मोठे पाठबळ दिलेले आहे. तसेच मी निरंतरपणे खदान विरोधी कार्य करित आहे , मी चुप बसलेलो नाही. मागे ग्रामसभेमार्फत एटापल्ली येथे सुरजागड व अन्य २५ खदान रद्द करणेबाबत जहाल मोर्चा व ठिया आंदोलन केले . त्या आंदोलनातुन मला व ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांना शासन प्रशासन पहाटे ६.०० च्या दरम्यान जबरदस्तीने उचलून नेले व फौजदारी कारवाही सुध्दा केली असून त्याबाबतच्या तारखा मी न्यायालयात भांडत आहे. असे असतांना मलाच बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. याशिवाय नुकताच मी दिल्ली ला जावुन आमच्यावर खदान कंपनी करीत असलेल्या अन्यायाबाबत हायकोर्टाच्या वकिलांशी चर्चा करुन पत्रकार परिषद घेवून आपल्यावर होणारे अन्यायाची देशभर प्रसिध्दी केली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांच्या पुढाकाराने विद्यमान आमदार मा.भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात विधान परिषदेत खदानी बंद करण्यात याव्यात यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न लावून धरुन शासन प्रशासनाला जाब विचारला. कंपणीच्या दलालांना हे सहन झाले नाही त्यामुळे माझी बदनामी करत आहेत. आमच्या संपूर्ण ग्रामसभा आदिवासी बांधवांना होणाऱ्या अन्यायाबाबत व जल , जंगल , जमिन यांच्या होणाऱ्या नुकसानीला विरोध करण्यास सक्षम आहेत. आमचे हक्क मिळविण्यास नेहमी संघर्ष केला आहे आणि करत राहणार आहे. माझ्यावर करण्यात येणारे आरोप हे बिनबुडाचे असून आमच्या भागातील जनतेच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचे काम सुरु आहे . सदर कामामुळे माझ्या परिवारास व माझ्यावर काही विपरित घडल्यास याला जबाबदार माझ्यावर आरोप करणारे दलाल व शासन प्रशासन राहील. मी अखेरच्या श्वासापर्यंत सुरजागडचा संघर्ष सुरु ठेवणार असून मी असो किंवा नसो जनतेनेही आपला हा संघर्ष सुरु ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
देश-विदेश

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

July 23, 2026
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे
देश-विदेश

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे

July 16, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’

July 15, 2026
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
Next Post
पांडुरंग आखाड्या चा बारा वर्षीय पै. फरहान तांबोळी याची वस्ताद हनुमंत भूसनर व शिराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती क्षेत्रात दैद्दीयमान यशस्वी वाटचाल.

पांडुरंग आखाड्या चा बारा वर्षीय पै. फरहान तांबोळी याची वस्ताद हनुमंत भूसनर व शिराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती क्षेत्रात दैद्दीयमान यशस्वी वाटचाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In