पांडुरंग आखाड्या चा बारा वर्षीय पै. फरहान तांबोळी याची वस्ताद हनुमंत भूसनर व शिराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती क्षेत्रात दैद्दीयमान यशस्वी वाटचाल.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील चंद्रशेखर विद्यालयात इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या अवघ्या बारा वर्षाच्या फरहान सुरज तांबोळी याने पांडुरंग आखाड्याचे वस्ताद हनुमंत भुसनर आणि शिराज शेख व कुस्तीप्रेमी वडील पै.सुरज शहाजहान तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.वडील स्वतः कुस्ती प्रेमी असल्यामुळे तो लहानपणापासूनच त्याला कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली. या आवडीमुळेच त्याने 05-03-2021रोजी श्रीपूर येथील पांडुरंग आखाड्यात प्रवेश घेतला. आणि तेव्हापासून त्याने खऱ्या अर्थाने कुस्ती चा श्रीगणेशा केला. वस्ताद हनुमंत भूसनर आणि शिराज शेख यांच्या मार्गदर्शना खाली त्याचा सराव चालू आहे.बोरगाव येथील भैरवनाथ यात्रेत आपल्या जीवनातील पहिली कुस्ती खेळून त्यात तो विजयी झाला. त्याला आयोजकांनी 15रुपये बक्षीस म्हणून दिले. त्यानंतर त्याने पुढे देखील आपली विजयाची परंपरा सुरु ठेवली आहे.माळखांबी, पेहे, खुडूस, सोनके, वाखरी, टाकळी, बाभुळगाव, होळे, फळवणी, वडापुरी, बादल कोट, खळवे, खेडभोसे, अकलूज, महाळुंग, कवठाली, पंढरपूर, आणि पिराची कुरोली येथील उरुस मध्ये त्याने आपल्या प्रतिस्पर्धेकावर विजय मिळविला. त्याचा खेळ पाहून प्रशांत परिचारक (मालक )यांनी देखील त्याला प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.युवा पैलवान फरहान तांबोळी याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे फरहान चे वडील पै. सुरज तांबोळी हे श्रीपूर येथे छोटेसे चिकन दुकान चालवीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.त्यामुळे त्याला भविष्यात चांगली कुस्ती करण्यासाठी आणि श्रीपूर चा नाव लौकिक वाढविण्यासाठी खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे.याविषयी फरहान याला विचारले असता, तो म्हणाला की मला भविष्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरायचे असून, त्यासाठी मी वस्ताद आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आतापासूनच तयारी करीत असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.केवळ खेळातच नाही तर शाळेत देखील तो हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातुन स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक (मालक )यांच्या सहकार्यातून पांडुरंग आखाड्या ची निर्मिती झाली असून प्रशांत परिचारक (मालक )आणि पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंतराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग आखाडा चालू आहे. वस्ताद हनुमंत भूसनर आणि शिराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा छोटा पैलवान फरहान तांबोळी हा भविष्यात महाराष्ट केसरी ची गदा मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.त्याला भावी वाटचालीसाठी हृदयापासून हृदयापर्यंत हार्दिक शुभेच्छा.























