अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

अकलूज : (प्रतिनिधी )क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण अकलूज येथे आयोजित करण्यात आले आहे.
परिसरातील नागरिकांना एकत्र येऊन अंतिम सामन्याचा थरार अनुभवता यावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणारा अंतिम सामना India national cricket team आणि New Zealand national cricket team यांच्यात रंगणार आहे
. हा सामना विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, अकलूज येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाचे आयोजन उदयसिंह क्रीडा मंडळ, अकलूज यांच्या वतीने करण्यात आले असून अकलूज व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर अकलूज व परिसरात क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 🏏







