*विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
०१ मार्च २०२६ रोजी पिसेवाडी येथे रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा “छत्रपती चषक” दोन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला.
ही स्पर्धा युवानेते श्री.साहिल आतार (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिसेवाडी, कार्याध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार माळशिरस तालुका) व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
🏏 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूनमा.श्री.आ.उत्तमराव जानकर साहेब (सदस्य,माळशिरस विधानसभा)श्री. पांडुरंग तात्या वाघमोडे (मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर)श्री. मिलिंद सरतापे (रिपाई तालुकाध्यक्ष, वेळापूर जिल्हा परिषद सदस्य)मा.सौ.डॉ. स्नेहलताई जीवन जानकर (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, वेळापूर)श्री. रजनीश बनसोडे (सरपंच, वेळापूर)श्री. सोमनाथ पिसे(पंचायत स)श्री. रजनीश बनसोडे (सरपंच, वेळापूर)श्री. सोमनाथ पिसे (तालुकाध्यक्ष, ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस )श्री. रायचंद खाडे (उद्योजक, ग्रामपंचायत सदस्य पिसेवाडी)मा.श्री. इलाई आतार (प्रगतशील बागायतदार पिसेवाडी)श्री.डॉ.धनंजय म्हेत्रे,तसेच माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, पिसेवाडी गावातील मान्यवर, विविध गावांतील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✨ प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
.🏏 छत्रपती चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना वीर विजय,अकलूज विरुद्ध दत्तनगर खंडाळी या संघांमध्ये रंगला आणि दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विरविजय संघाने मिळविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दत्तनगर खंडाळी संघाला मिळाले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा दिमाखात पार पडला.
🏆 पारितोषिक वितरण
🥇 प्रथम क्रमांक – ₹३०,००१/- व आकर्षक ट्रॉफी – युवानेते श्री. साहिल आतार यांच्या वतीने🥈 द्वितीय क्रमांक – ₹२०,००१/- व ट्रॉफी – डॉ. धनंजय म्हेत्रे व डॉ. मिलिंद पवार यांच्या वतीनेही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, युवकांमध्ये एकात्मता, क्रीडाभावना आणि छत्रपतींच्या विचारांचा जागर निर्माण करणारी ठरली.
⚔️ “शौर्य, स्वाभिमान आणि संघटन — हाच छत्रपतींचा संदेश!”







