पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

पुणे 🙁 प्रतिनिधी)महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी संपली.
अंतिम चित्र ९ ऑक्टोबर रोजी
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले असून, प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबतच काही बंडखोर व अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत बहुरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे .पदवीधर मतदारसंघात २९ उमेदवारांचे ३३ अर्ज पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उपलब्ध माहितीनुसार २९ उमेदवारांनी एकूण ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉ. जाधव या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून पदवीधरांच्या रोजगार, कौशल्य विकास, स्टार्टअप आणि इन्क्युबेशनच्या संधी यांसारख्या विषयांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव प्रमुखपणे पुढे आले आहे. याशिवाय काही इच्छुक आणि अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील लढत सध्या बहुकोनी दिसत आहे.
शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे ३८ अर्ज
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट)कडून मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ मिळाल्याची माहिती आहे.
त्यामुळे महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीवरून निर्माण झालेला मतभेद या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सुनील जगताप यांनीही अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय इतर उमेदवारही रिंगणात आहेत.
महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान
पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत महायुतीतील घटक पक्षांमधून स्वतंत्र उमेदवारी दाखल झाल्याने राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत.
विशेषतः शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेना (शिंदे)चे मंगेश चिवटे हे दोघेही मैदानात असल्याने महायुतीतील समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत यातील कोण उमेदवारी कायम ठेवतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
.९ ऑक्टोबरनंतर अंतिम चित्र स्पष्टउमेदवारी अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर २०२६ आहे.
त्यामुळे सध्या दाखल झालेल्या सर्व अर्जांपैकी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात, हे ९ ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार आहे.
२३ ऑक्टोबरला मतदान
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतदान पद्धत सामान्य विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असून, मतदारांना उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार मतदान करावे लागते.
‘संघर्ष योद्धा न्यूज’चे आवाहन
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदार यादीत आपले नाव तपासून मतदानाबाबतची आवश्यक माहिती जाणून घ्यावी. अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार, त्यांचे पक्ष, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम आणि निवडणुकीतील प्रमुख मुद्दे याबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे. संघर्ष योद्धा न्यूज जनतेचा आवाज







