दैनिक रोखठोक तर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष योध्दा चे माळशिरस तालुका प्रतिनिधी रणजितदादा कांतिलाल गायकवाड यांना जाहीर..
संघर्ष योध्दा प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दैनिक रोखठोक च्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष योध्दा चे माळशिरस तालुका प्रतिनिधी रणजितदादा कांतिलाल गायकवाड यांना जाहीर झाला आहे

पत्रकार म्हणून काम करत असताना रोखठोक व सडेतोड निडर होऊन वार्तांकन करणाऱ्या रणजितदादा गायकवाड हे पत्रकारीते बरोबरच रक्तदान वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल देणे गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असतात
त्यांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो याची दखल घेत दैनिक रोखठोक च्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे

२७मे रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरणाच्या जंगी मा रामरावजी वडकुते ( राज्यसभा सदस्य) यांच्या हस्ते व चंद्रकांत कवळेकर (माजी उपमुख्यमंत्री गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशांत सातव. डॉ.पंकज भिवटे (भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य) शिवराज नायकवडे(सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या कार्यक्रमात सदरिल पुरस्कार रणजितदादा गायकवाड यांना सुपूर्द करण्यात येणार आहे
हे व्रुत्त समजताच माळशिरस परिसरातील त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त करताना त्यांच मनःपूर्वक अभिनंदन केले













*संघर्ष योध्दा चे संपादक गणेश जाधव यांनीही रणजितदादा गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या*









