• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 28, 2026
in शैक्षणिक
0
पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी       आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला
0
SHARES
328
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरीआय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला

अकलूज (प्रतिनिधी)ज्ञान, वेग आणि अचूकतेची कसोटी मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

गोवा येथील पणजी येथे महाराष्ट्र टीचर अबॅकस असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत आय चॅम्प अबॅकस प्रा. लिमिटेड या संस्थेच्या पळसदेव, दसूर, 25/4 आणि दहिवडी येथील फ्रँचायझीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत माळशिरस तालुक्याचा डंका राष्ट्रीय स्तरावर वाजवला.

देशभरातील तब्बल पाच राज्यांमधून 24 नामांकित कंपन्यांचे शेकडो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत आय चॅम्प अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी वेगवान गणिती कौशल्य, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अचूक उत्तरांच्या जोरावर विविध गटांत चॅम्पियन किताब तसेच विशेष प्राविण्य पुरस्कार पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य संचालक विशाल माने, स्नेहल माने यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.

तसेच फ्रँचायझी संचालिका सौ. सुवर्णा वाघमोडे, कु. शुभांगी बिस्नाल, सौ. राजश्री देशमुख आणि नुरजहान शेख यांनी विद्यार्थ्यांकडून सातत्यपूर्ण सराव करून घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षमपणे तयार केले.

या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक संस्था प्रतिनिधी, अबॅकस प्रशिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक करण्यात आले.

स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गुरुराज अमोल कोळेकर, आदिती सोमनाथ चव्हाण, वल्लभ महादेव कोळेकर, संकष्टी तुषार अडागळे, स्वरा आकाश नागरे, आदेश राजेंद्र कन्हेरकर, हर्षदा शरद कोळेकर, राज अनिल बनसुडे, प्रणव नागनाथ चव्हाण, विश्वपरी दशरथ दगडे, सोहम समाधान जगताप, गणेश मनोज थोरात, तस्मिया सत्तार शेख, चैतन्य भरत राठोड, आयशा हमीद कोरबू, संग्राम ज्योतिराम सावंत, आर्यन रुपेश राठोड आणि विजय रोहिदास राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीने माळशिरस तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले.

पारितोषिक वितरण समारंभ विविध कंपनी ओनर्स आणि मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री तसेच आय चॅम्प अबॅकसचे संचालक, विविध कंपन्यांचे संचालक, शिक्षक आणि पालक उपस्थित होते

.विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“मेहनत, नियमित सराव, आत्मविश्वास आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले,” अशा भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केल्या

.राष्ट्रीय स्तरावर माळशिरस तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करून ते देशपातळीवर आपला ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण चॅम्पियनशिपचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध नियोजन महाराष्ट्र टीचर अबॅकस असोसिएशनचे प्रमुख उमेश महाजन यांनी केले.

#अबॅकसस्पर्धा#राष्ट्रीयअबॅकसस्पर्धा#माळशिरसतालुका#अकलूज#गोवापणजी#ICHAMPAbacus#आयचॅम्पअबॅकस#विद्यार्थ्यांचीयशोगाथा#चॅम्पियन#विद्यार्थ्यांचेकौतुक#गौरवमाळशिरसचा#AbacusChampion#YoungTalents#StudentAchievement#MentalMaths#ProudMoment#NationalCompetition#MaharashtraTalent#FutureChampions#EducationExcellence

Related Posts

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज
शैक्षणिक

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज

June 28, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप
शैक्षणिक

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप

June 26, 2026
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी
शैक्षणिक

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी

June 20, 2026
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू

June 13, 2026
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल                                                     विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी;    ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय
शैक्षणिक

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय

June 5, 2026
पेपरफुटी : देशाच्या भविष्यावरचा घात*
शैक्षणिक

पेपरफुटी : देशाच्या भविष्यावरचा घात*

May 14, 2026
Next Post
फुलाबाई काशिद यांचे निधन.*

फुलाबाई काशिद यांचे निधन.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!