• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील असावे – अकलूज निर्भया पथकाचे आवाहन.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 13, 2026
in Uncategorized
0
सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील असावे – अकलूज निर्भया पथकाचे आवाहन.
0
SHARES
129
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील असावे – अकलूज निर्भया पथकाचे आवाहन.

माळीनगर(प्रतिनिधी)- विद्यार्थी हेच आई-वडील, समाज, अन देशाचे भविष्य असून सर्वगुण संपन्न व सक्षम पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करून देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल असे मत निर्भया पथक अकलूजचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान देशमुख यांनी येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, माळीनगर येथील भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक रितेश पांढरे, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, माळीनगर येथील डॉ. फारुक शेख, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी हे उपस्थित होते. श्री.देशमुख यांनी निर्भया पथकाचे कामकाजाबाबत थोडक्यात माहिती सांगून महिलांच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी त्यासाठी असणारे विविध कायदे याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर यांनी महिलांविषयीचे गुन्हे, सायबर क्राईम, मोबाईलसह सोशल मीडियाचा अतिरेकी वापर व त्याचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

पुढे बोलताना श्री.देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्काराची नितांत गरज असून त्यांच्याकडे शिस्त, संयम, संवेदनशीलता, नम्रता,विवेक,आदरभाव, प्रामाणिकपणा,कष्ट,संघर्ष करण्याची तयारी हे गुण असणे अत्यंत आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, शिक्षक व सन्माननीय व्यक्तींचा आदर राखण्याच्या सूचना दिल्या.

तसेच चांगले मित्र व चांगल्या व्यक्तींचा सहवास हा जीवनाच्या वाटचालीसाठी कसा पूरक व प्रेरणादायी असतो हे पटवून दिले. समाजातील विघातक प्रवृत्तीच्या लोकांपासून व सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देऊन छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सिंधुताई सपकाळ,कल्पना चावला, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा व्यक्ती आपले आदर्श असायला हवेत असे ते म्हणाले.

सह्याद्रीच्या कुशीतील महाराष्ट्राच्या महान भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोरोबा, संत सावता माळी हे थोर संत तसेच महापुरुष अनेक समाजसुधारकांच्या कार्य कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्मलो, वाढलो याबाबत कृत कृत्याची भावना आपल्या मनात सदैव असायला हवी. शिक्षण,साहित्य,समाज सुधारण, संगीत,कल,क्रीडा इत्यादी क्षेत्रातून आपल्यापर्यंत आलेला वारसा जतन करून तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून मी काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने आपला देश समाज आणि कुटुंबासाठी योगदान देणे खूप आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपली आवड अन छंद जोपासून जगण्याची अभिरुची वाढवायला हवी,आपली संस्कृती,परंपरा, कायदे,नियम, हक्क व कर्तव्य यांचा मान राखून एक आदर्श व जबाबदार नागरिक बनवून देशाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन श्री.देशमुख यांनी केले. शेवटी सहशिक्षक नवनाथ गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

Related Posts

चार दशकांची निर्भीड लेखणी :                                         ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या                    ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!
Uncategorized

चार दशकांची निर्भीड लेखणी : ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!

July 4, 2026
Uncategorized

जागतिक रेड क्रॉस दिन* मानवतेचा लाल दीप : सेवा, समर्पण आणि करुणेचा जागतिक उत्सव”

May 8, 2026
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका*                                     *योग्य जोडीदाराच्या शोधा*…                                     *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं*                                                 *क्रमशः भाग – १९*
Uncategorized

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* *योग्य जोडीदाराच्या शोधा*… *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं* *क्रमशः भाग – १९*

April 26, 2026
रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक                          लेखक  प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर
Uncategorized

रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक लेखक प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर

March 26, 2026
जयघोषापेक्षा विचारांचा जागर!…..
Uncategorized

शिवजयंती आणि दहावीचे विद्यार्थी : परीक्षा, संयम आणि विजयाची तयारी

February 19, 2026
रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न
Uncategorized

रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न

February 3, 2026
Next Post
#त्रिमूर्ती_केसरी_कुस्ती_स्पर्धा_ अकलूज_२०२६            रविराज चव्हाण ठरला अकलूज त्रिमूर्ती केसरीचा  मानकरी

#त्रिमूर्ती_केसरी_कुस्ती_स्पर्धा_ अकलूज_२०२६ रविराज चव्हाण ठरला अकलूज त्रिमूर्ती केसरीचा मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!