कुमार रंगनाथ लावंड यांचे निधन अकलूज
(प्रतिनिधी )अकलूज येथील रामायण चौक येथील रहिवाशी कुमार रंगनाथ लावंड (वय 69 वर्ष )यांचे 18नोव्हेंबर रोजी आकस्मित निधन झाले.
त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशाभूमी येथे अंत्संस्कार करण्यात आले.
अकलूज ग्रामपंचायत मध्ये 27 वर्ष त्यांनी सेवा बजावली.2018 मध्ये सेवा निवृत्त झाले होते.
त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या तिसऱ्याचा(सावडण्याचा) विधी 20नोव्हेंबर रोजी अकलाई स्मशानभूमी येथे सकाळी 7वाजता होणार आहे.
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







