*रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी
अकलूज दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज *रत्नाई महोत्सव* २०२५वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला.


प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत हलगीच्या व लेझीमच्या तालावर करण्यात आले. स्वागत गीतातून पाहुण्यांचे स्वागत झाले देखण्या, अनोख्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघ यांनी केले. सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील, नटराज प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी सुषमा महामुनी प्र.गटशिक्षणाधिकारी,माळशिरस, भक्ती नाचणे प्र.विस्तार अधिकारी माळशिरस शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे संचालक रामचंद्र गायकवाड,बाळासाहेब सणस, पांडुरंग एकतपुरे,उत्कर्ष शेटे प्रशाला समिती सदस्या नयना शहा, गिरिजा उघडे,मनीषा चव्हाण परीक्षक शकील मुलाणी, रणजीत बाबर मुख्याध्यापक संजय गळीतकर, यशवंत माने देशमुख अनिता पवार उपस्थित होते. यावेळी सुषमा महामुनी आपल्या भाषणातून जिजामाता कन्या प्रशालेच्या शिस्त, प्रगती, अभ्यासातील नाविन्यपूर्ण प्रयोग,कलाकारांना संधी देण्यासाठी स्नेहसंमेलन खऱ्या अर्थाने पर्वणी असते. मौलिक असे विचार व्यक्त केले. रंगमंच पूजनाच्या नंतर पहिल्या भागामध्ये रत्नाई संगीत वाद्यवृंदाने बहारदार ८ गीते ही गाऊन व वादन करून सादर केली. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी स्मृतिभवन रंगमंच दुमदूमून गेला. गट क्रमांक १ मध्ये इयत्ता५वी ते७वी इ.११वी बालगीत,शेतकरी गीत,वारकरी गीत, चित्रपट गीत,देशभक्तीपर गीत,साउथ इंडियन गीत, गट क्रमांक २ इ. ८वी ते १०वी लावणी, पहाट गीत, गोंधळी गीत, कोळी गीत, गरबा गीत,शौर्य गीत,चित्रपट गीत बहारदार अशी गीत सादर झाली. वाद्यवृंद व विविध गुणदर्शन गीते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी शब्दसुमनांनी प्रफुल्लित करणारे होते.दहा दिवसात केलेल्या कष्टाचं खऱ्या अर्थानं स्मृतिभवनच्या रंगमंचावरती कला सादर करण्याबरोबरच एक आत्मविष्कार यातून जागृत झाला व कलेची नवी ओळख या निमित्ताने पुढे आली असं पालकांनी मत व्यक्त केलं हजारो रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांनी कलाकारांना पाठीवर कौतुकाची थाप मिळाली सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावरती कलाविष्काराचा आनंद चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता. महिला पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वयंसेवकांनी सभागृहामध्ये शिस्त ठेवली होती. निकाल वाचन व पारितोषिक वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. विजेत्या संघांच्या चेहऱ्यावरती मनमुराद आनंद होता. कार्यक्रमाचा सांगता सोहळा सारे जहाँ से अच्छा या गीताने झाला. आभार पर्यवेक्षक प्रवीण गोडसे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सुर्यवंशी व राजकुमार पाटील यांनी केले. रत्नाई महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी व सेवक बंधू आणि भगिनी यांनी कष्ट घेतले होते.







