*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
बागेचीवाडी तालुका माळशिरस येथील पै किरण शिवाजी फुके( वय वर्ष 33 )यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले आई वडील पत्नी भाऊ बहीण असा परिवार आहे
बागेची वाडी येथील आणि परिसरातील गावांमध्ये *”पैलवानातला पैलवान”* म्हणून ओळखले जाणारे, मैत्री जपणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे *किरण शिवाजी फुके* यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
किरण पैलवान हे केवळ एक खेळाडू नव्हते, तर ते सर्व पैलवानांचे मित्र, मार्गदर्शक आणि तालुक्याचे नाव उंचावणारे व्यक्तिमत्व होते.
बागेचीवाडी गावातील आनेक मुलांना व्यायामाची आवड हि किरण यांच्याकडे बघूनच झाली आहे
त्यांची कुस्तीतील कर्तबगारी आणि माणुसकी सर्वांनाच कायम लक्षात राहील.त्यांच्या जाण्याने माळशिरस तालुक्यातील कुस्ती विश्वाची आणि आम्हा सर्वांची मोठी हानी झाली आहे.
*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.**भावपूर्ण श्रद्धांजली*







