अकलूज नगरपरिषद निवडणूकीत तीन उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
अकलूज – (प्रतिनिधी )अकलूज नगर परिषदेच्या निवडणूकीमध्ये 107 उमेदवार पात्र झाले होते. 19नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी 3 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
प्रभाग क्रमांक 6 अ मधील 1 उमेदवार , 6 ब मधील 1 उमेदवार. प्रभाग क्रमांक 7 अ मधील अपक्ष उमेदवार यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
शुक्रवार दी. 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे.त्यानंतरच निवडणुकीत किती उमेदवार असतील याचे चित्र स्पष्ट होणार आहे







