पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
अकलूज | संघर्ष योद्धा न्यूज
महाविकास आघाडीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. हर्षदा ताई देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज अकलूज, करमाळा आणि टेंभुर्णी येथे बैठका घेतल्या.

या बैठकांदरम्यान आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. निवडणुकीची रणनीती, प्रचाराचे नियोजन तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातील सर्व पदवीधर मतदारांनी सौ. हर्षदा ताई देशमुख-जाधव यांना पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकांमुळे संबंधित भागातील निवडणूक प्रचाराला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.








