• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

माळशिरस तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरु

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 21, 2025
in आपले शहर
0
माळशिरस तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरु
0
SHARES
305
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरु

अकलूज (प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील नदी पात्रा शेजारी असलेल्या काही गावातून नदीच्या पात्रातून यांत्रिक बोटी च्या सहाय्याने दिवसा व रात्रीच्या वेळी रोज हजारो ब्रास बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याचे चित्र आहे.

महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.गेल्या कित्येक महिन्यापासून नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. शासनाकडून कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नसताना. बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे.

मात्र महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून व पोलिसांकडुन या वाळू माफियावर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी होत असल्याचे चित्र आढळून आले आहे.

प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे.

शासनाच्या परवानगीविना रोज हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे. टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे व जे सी बी च्या मदतीने वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.कोणी तक्रार केली तर कारवाई केली जाते. मात्र त्यात सातत्य नाही.

या वाळू उपस्या मुळे नदी काठी असलेल्या विहिरी आणि शेत जमिनीला धोका निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा महसूल विभागाच्या व पोलिसांच्या संमतीने सुरू आहे कि काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे

.वाळू उपशातून बक्कळ पैसा व या पैशांतून चैन तसेच खाजगी सावकारकी असे वाळू माफियांचे समीकरण आहे. त्यामुळे तालुक्यात अवैध वाळू उपशाचा व्यवसाय तेजीत आहे. सध्या चार ब्रास वाळू 20ते 30 हजार रुपये दराने विकली जात आहे, मात्र त्यामुळे अवैध उपशामुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

तसेच, या बेकायदा व बेसुमार उपशामुळे नद्यांमधील प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच बेसुमार वाळू उपस्या मुळे नदी पात्रातील पाणी साठा कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी पाणी देखील शिल्लक राहणार नाही.नदीच्या पात्रातून वाळू चोरी करत असलेले टिप्पर हे मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत आहेत. या प्रकारामुळे रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांना अपघाताचे आमंत्रण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.प्रशासन कारवाई करतील या भितीपोटी वाळू माफियांकडून भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचप्रमाणे मोठया प्रमाणावर वाळू वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. कारवाईचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वाळू तस्करांवर जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाकडून कारवाई केली जात नसल्याने त्यांच्यावर विशेष परिणाम होत नसल्याचे दिसत आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरु आहे, बोटिंचे आणि काही वाहनांचे हप्ते घेतले जात असल्याचे बोलले जात आहे.नागरिक अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

याकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा प्रकार थांबवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होऊ लागली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
संगम शेवरे रोडवरती काँक्रीटीकरण करावे यासाठी युवा सेनेच्या वतीने संगम येथे रस्ता रोको

संगम शेवरे रोडवरती काँक्रीटीकरण करावे यासाठी युवा सेनेच्या वतीने संगम येथे रस्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In