संगम शेवरे रोडवरती काँक्रीटीकरण करावे यासाठी युवा सेनेच्या वतीने संगम येथे रस्ता रोको
अकलूज (प्रतिनिधी) संगम शेवरे येथील भीमा नदीच्या काठी असलेल्या प्रमुख रस्ता मेघा कंपनीने काँक्रिटीकरण करून देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश दादा इंगळे युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे महादेव लोखंडे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
.यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख अशा ताई टोणपे उपस्थित होत्या. संगम शेवरे रस्ता हा अकलूज टेंभुर्णी या प्रमुख दळणवळणाचा रस्ता असून दररोज मोठ्या प्रमाणात ये जा केली जाते तसेच मालवाहतूक केली जाते आपत्कालीन रुग्णवाहतूक केले जाते याच रोडवरती अनेक साखर कारखान्यास ऊस वाहतूक केली जाते. रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्रचंड मोठ मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य मुळे सामान्य माणसांचे मणक्याचे तसेच धुळीमुळे शोषणाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत यावेळी मेघा कंपनीला लक्षात आणून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत व निकृष्ट पद्धतीचे काम करून विविध युवासेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या आक्रोश हा मेगा कंपनीवरती केलेला असून येत्या एका महिन्यात काम न केल्यास मेघा कंपनीचे कार्यालय लक्ष केले जाईल असा गर्भिक इशारा युवासेना प्रमुख गणेश दादा इंगळे यांनी आज रस्ता रोको दरम्यान केला.
यावेळी सागर इंगळे.नरा इंगळे,प्रशांत पराडे,धनाजी मस्के, आबा गोसावी,पपू जमदाडे,आप्पा महाडिक ,प्रवीण पराडे,अक्षय पराडे, ओम पराडे ,विकास भोई, दीपक भोई , रज्जाक मुलानी,अमित भोई ,आदित्य भोई,रोहन इंगळे, शेखर इंगळे, गणेश काळे, भैरवनाथ मोरे, नवनाथ इंगळे, रोहित इंगळे, आजिनाथ इंगळे, आप्पा भोई, किरण पराडे, संता भोई, शंभू भोई, आयुष इंगळे,राहुल सुतार. विशाल मस्के. महेश मस्के इ उपस्थित होते टीप : संगम शेवरे या ठिकाणी काँक्रीटीकरण ३० दिवसात करून देण्यात येईल असे आश्वासन मेघा कंपनीने दिल्या नंतर युवा सेनेने रस्ता रोको आंदोलन थांबवले .






