पोलिसांवरील हल्याचा निषेध करीत पोलिसांच्या पाठीमागे उभे राहणार-सकल हिंदू समाज
अकलूज (प्रतिनिधी )१७ मार्च २०२५ रोजी नागपूर येथे जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली, तलवार व कुऱ्हाडने हल्ला केला. यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झालेले असून,यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. याचबरोबर उपायुक्त स्तराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गंभीर जखमी आहेत.
या निंदनीय प्रकाराचा हिंदू समाज तीव्र निषेध करतो. खाकी वर हात टाकणाऱ्या या जिहादी समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे.जेणेकरून पुन्हा कोणीही असे धाडस करणार गाठी. या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठामपणे उभा आहे.अशा आशयाचे निवेदन माळशिरस तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने अकलूज पोलीस ठाणे ला देण्यात आले.
यावेळी माळशिरस तालुक्यातील हिंदू बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक बांधवानी आपले मनोगत व्यक्त केले.
निवेदनात पुढे असे सांगितले आहे की, संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्या जिहाद्यांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल.हिंदू समाज देखील आंदोलन करतो, आपल्या मागण्या मांडतो, हिंदूंच्या देखील भावना तीव्र असतात. पण हिंदू समाज कधीही कायदा हातात घेत नाही. संविधानाच्या चौकटीत राहून आपलं म्हणणं मांडतो. आपल्या वर्तणुकीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देत नाही. कारण हा सभ्य व कायद्याचा आदर असणारा समाज आहे. याची वेळोवेळी प्रचिती आपणास आलेली असेलच.या धर्मांध झुंडशाहीच्या वृत्तीला आळा घालण्याकरिता आपण आपल्या भागातील बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर, अवैध व्यवसाय, लव्ह जिहाद चे षडयंत्र चालवणाऱ्या शक्ती, लैंड जिहाद च्या माध्यमातून सार्वजनीक जमिनींवर मजारी व थडगी उभी करून जमीन बळकावणारे गुंड, नागरिकांना हैराण करणारे बेकायदेशीर भोंगे यांचे वर कडक कारवाई करावी.
जेणेकरून आपल्या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील व कायद्याचा सन्मान करणारा, भारत भूमीला माता मानणारा हिंदू नागरीक सुरक्षित व सन्मानाने जगू शकेल.कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा प्रकारच्या धर्मांध शक्तींच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी हा हिंदू समाज पूर्ण शक्तीनिशी उभा राहील या बाबत आपण निःशंक राहावे.(महाराष्ट्र पोलीस के सम्मान में, हिंदू समाज मैदान में.)असे निवेदन संविधान, कायदा सुव्यवस्था व महाराष्ट्र पोलीस यांबाबत कायमच आदराची भावना असणारे व त्याचे रक्षण करण्याकरिता तत्पर असणारे हिंदू नागरीक यांच्या वतीने अकलूज पोलीस ठाणे ला देण्यात आले.







