निमा संघटना माळशिरस तालुकाच्या नूतन अध्यक्षपदी डॉ अमोल माने-शेंडगे, उपाध्यक्षपदी डॉ हर्षवर्धन गायकवाड व डॉ तुळशीदास रुपनवर,यांची निवड
अकलूज (प्रतिनिधी )निमा संघटना माळशिरस तालुकाच्या नूतन अध्यक्षपदी डॉ अमोल माने-शेंडगे, उपाध्यक्षपदी डॉ हर्षवर्धन गायकवाड व डॉ तुळशीदास रुपनवर, सचिव पदी डॉ दादासाहेब पराडे पाटील व खजिनदार पदी डॉ दिलीप पवार यांची निवड
निमा संघटना ही बी.ए.एम.एस डॉक्टरांची देशव्यापी संघटना असून संपूर्ण भारतभर या संघटनेच्या शाखा कार्यरत आहेत.डॉक्टरांच्या विविध समस्या दूर करण्याचे काम या संघटनेद्वारे केले जाते.
माळशिरस तालुक्यामध्ये एकूण 250 बी.ए.एम.एस डॉक्टर्स असून त्या सर्वांमधून 2 वर्षाकारिता कार्यकारिणी ची निवड केली जाते. निमा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा अकलूज याठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी निमा संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत मागील दोन वर्षाचा कार्य अहवाल व जमा खर्च अध्यक्ष डॉ शिरीष रणनवरे,डॉ अस्लम शेख डॉ उदयसिंह माने देशमुख यांनी सादर केला.सदर सभेत पुढील दोन वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी डॉ अमोल माने-शेंडगे ,उपाध्यक्षपदी डॉ हर्षवर्धन गायकवाड व डॉ तुळशीदास रूपनवर तर सचिव पदी डॉ दादासाहेब पराडे, खजिनदार पदी डॉ दिलीप पवार यांची निवड करण्यात आली.
.नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सर्वाना सोबत घेऊन व ज्येष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात काम करण्याचे अभिवचन सभेत उपस्थित सर्व डॉक्टरांना दिले.
नवीन कार्यकारीणीचा सत्कार यावेळी उपस्थित असणारे एम सी आय एम ए चे माजी सदस्य डॉ तानाजीराव कदम,केंद्रीय सदस्य डॉ मिलिंद गुळभिले, डॉ बाळकृष्ण नष्टे,डॉ नानासाहेब तरंगे, डॉ तानाजीराव काटकर ,डॉ रमेश बिडवे,डॉ प्रविण पाटील, डॉ सुधीर पोफळे, डॉ उत्तम खरात,डॉ शशिकांत मगर,डॉ सुनील चव्हाण या सर्वांच्या शुभहस्ते करण्यात आला ..
निमा वुमन्स फोरम संघटनेच्या अध्यक्ष डॉ अंजली कदम,डॉ रुपाली पराडे पाटील व सर्व महिला डॉक्टर्स कडून देखील नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान संपन्न झाला..सभेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ प्रशांत निंबाळकर यांनी केले आभारप्रदर्शन डॉ अस्लम शेख यांनी केले…







