*हिंदू देवी-देवतांचे व महापुरुषांचे प्रतिमा असलेले फटाके विक्री थांबवण्याची हिंदू संघटनांची मागणी.
.*माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड २६/१०/२४ रोजी सकाळी ११ वाजता, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,माळशिरस तालुका अकलूज विभाग व हिंदू जनजागृती समिती अकलूज यांच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशन व अकलूज नगरपरिषद अकलूज यांना हिंदू देव देवता राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा असलेले फटाके विकण्यास व्यापारी व दुकानदार यांच्यावर बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आले.
अकलूज पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार सचिन डुबल यांनी तर अकलूज नगर परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरे साहेब यांनी निवेदन स्वीकारले
.दिवाळी हा सबंध भारत वासियांचा एक महत्त्वाचा सण आहे जो की अतिशय आनंदामध्ये साजरा झालाच पाहिजे…
परंतु हा सण साजरा करत असताना एकीकडे आनंदोत्सव साजरा करणे तर दुसरीकडे हिंदू देवी देवता व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमा असलेल्या फटाके फोडणे हे कितपत योग्य आहे याचा सारासार विचार सबंध हिंदू बांधवांनी करावा
.म्हणजे एकीकडे संस्कृतीचं जतन कशाप्रकारे करावे हे आपण सांगत असतो आणि दुसरीकडे संस्कृतीचे वाभाडे सुद्धा आपणच काढत असतो.हे किती लांचनास्पद आहे.याचा विचार करणं गरजेचं आहे.असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान अकलूज विभाग व हिंदू जनजागृती समिती अकलूज सर्व कार्यकर्त्यांनी याठिकाणी बोलताना सांगितले. प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त अकलूज पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन हिंदू देवदेवता व राष्ट्रपुरुषांची प्रतिमा असलेल्या फटाके विकणाऱ्या वरती कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा काही फटाके विक्रेते या आदेशाचं उल्लंघन करून सर्रास देवी देवतांचे व राष्ट्रपुरुष यांची प्रतिमा असलेले फटाके विकत असतात
.कुठेतरी पोलीस प्रशासनाचा आदेशाला सुद्धा फटाके विक्रेत्यांकडून केराची टोपली दाखवली जात असते.परंतु यावेळी असं न होता अकलूज परिसरामध्ये जो कोणी फटाके विक्रेता हिंदू समाजाच्या भावना दुखवतील किंवा हिंदू संस्कृतीला अस्मितेला ठेच पोचवण्याचं काम करत असेल आशा फटाके विक्रेत्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंभोरे साहेब यांच्याकडून सांगण्यात आले
.त्याचप्रकारे अकलूज नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही हिंदू देवी देवता व राष्ट्रपुरुष यांची प्रतिमा असलेल्या फटाके विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई अकलूज नगर परिषदेच्या वतीने करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू जनजागृती समिती यांनी माध्यमांशी बोलताना आमचा कुठल्याही प्रकारे फटाके विक्रेत्यांना किंवा व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा हेतू नसून केवळ आणि केवळ आपल्या संस्कृतीचे जपण जतन आपल्या हातून व्हावे यासाठी केलेली ही धडपड आहे असं बोलण्यात आले
.यावेळी रणजीतदादा गायकवाड शिवाजीराव घोडके गणेशराव इंगळे सुधीर पवार महेश मेत्रे सागरराव व्यवहारे अक्षय चौगुले महेश जाधव महेश वगैरे आदी समाजबांधव उपस्थित होते.






