आनंदमुर्ती मित्र मंडळ यांचेकडून शिखर शिंगणापूर येथे महारुद्र अभिषेक संम्पन्न
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
आनंदमूर्ति मित्र मंडळ यांनी वार गुरुवार , दिनांक 24 /10/2024 ( गुरुपुष्यामृत योग , कालाष्टमी ) यादिवशी शिखर शिंगणापुर (मोठामहादेव) याठिकाणी श्रीशिवशक्ति महारुद्र अभिषेक महापुजा व महाआरती , तसेच श्री अमृतेश्वर मंदिर(बळी मंदिर) येथे अन्नपूजा म्हणजेच सांत्वन पूजा व शिव आराधना , ध्यान-साधन , नामस्मरण , गीत-गायन , आरती आणि महाप्रसाद असा सुंदर कार्यक्रम पार पाडला .
या कार्यक्रमामधे शिवपार्वती यांचे कडे जगतकल्याणात्मक आत्मोउद्धारत्मक तसेच सर्व संकट निवारणार्थ व उत्तम पर्जन्य , पीक पाणी व उत्तम आरोग्य विषयक संकल्प सोडण्यात आला .
आनंदमूर्ति मित्र मंडळ हे प्रत्येक श्रावणातील सोमवारी अकलाई घाट या ठिकाणी शिवशक्ति यांची सायंकाळी ०९:०० ते रात्री १२:०० या वेळेत महापुजा करत असते आज मंडळाने यशस्वीरित्या २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे ,शंभु महादेवाची पूजा करत असताना विविध अनुभव येत होते , सर्वानी उत्तम असा प्रतिसाद देत कार्यक्रम उत्साहामधे पार पाडला
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नागराज स्वरूपी शंभू महादेवाने प्रकट होऊन सर्वाना शुभ आशीर्वाद दिले.







